संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 08:20 PM2017-10-24T20:20:38+5:302017-10-24T20:40:51+5:30

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे.

The removal of the Vice-Chancellor of Mumbai University Sanjay Deshmukh, order of the Governor | संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून उचलबांगडी

संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून उचलबांगडी

Next

मुंबई -  मुंबई विद्यापीठाच्या निकालांना झालेला विलंब अखेर कुलगुरू संजय देशमुख यांना भोवला.  मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी संजय देशमुख यांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. 

ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्याने मुंबई विद्यापीठाच्या पेपर तपासणीमध्ये प्रचंड गोंधळ झाला होता. या गोंधळामुळे मुंबई विद्यापीठाने यावर्षी घेतलेल्या परीक्षांचे निकाल लागण्यास प्रचंड विलंब झाला. पेपरतपासणीमध्ये झालेला गोंधळ आणि निकालांना झालेल्या उशिरामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात कुलगुरू सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे देशमुख यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज राज्यपालांनी संजय देशमुख यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत त्यांना कुलगुरूपदावरून हटवले. 

मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत झालेल्या गोंधळामुळे, कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी सक्तीच्या रजेवर पाठविले होते. तसेच निकालात झालेल्या गोंधळाविषयी कुलगुरूंकडून स्पष्टीकरण मागण्यात आले होते. त्यानंतर आॅनलाइन निकालात गोंधळाविषयी माहिती देणारे विस्तृत पत्र कुलगुरूंनी राज्यपालांना पाठविले होते. 

विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून नवनव्या डेटलाइन देण्यात येत होत्या. मात्र ऑक्टोबर महिन्यापर्यंत विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ निवळला नव्हता. तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचेही समोर आले होते. या गोंधळामुळे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले होते. 

Web Title: The removal of the Vice-Chancellor of Mumbai University Sanjay Deshmukh, order of the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.