वेश्या व्यवसायातून सुटका केलेल्या महिलेस ‘मानलेल्या’ आईकडे देण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 06:23 AM2019-07-15T06:23:39+5:302019-07-15T06:24:15+5:30

‘वेश्याव्यवसायातून’ सुटका केलेल्या एका २२ वर्षीय महिलेस तिच्या कथित मानलेल्या आईकडे सुपूर्द करण्याचा आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच नकार दिला.

Rejected to give 'mother' to mother, who was released from prostitution business | वेश्या व्यवसायातून सुटका केलेल्या महिलेस ‘मानलेल्या’ आईकडे देण्यास नकार

वेश्या व्यवसायातून सुटका केलेल्या महिलेस ‘मानलेल्या’ आईकडे देण्यास नकार

googlenewsNext

मुंबई : पंढरपूर पोलिसांनी सुमारे सात महिन्यांपूर्वी तेथील ‘संगम लॉज’वर धाड टाकून ‘वेश्याव्यवसायातून’ सुटका केलेल्या एका २२ वर्षीय महिलेस तिच्या कथित मानलेल्या आईकडे सुपूर्द करण्याचा आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच नकार दिला. मात्र न्यायालयाने या महिलेची बारामती येथील शासकीय प्रेरणा वसतिगृहातून सुटका केली.
‘संगम लॉज’ंध्ये वेश्याव्यवसाय चालतो अशी खबर मिळाल्यावरून पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने ही धाड टाकली होती.
त्यावेळी वेश्याव्यवसायात कथितपणे बळजबरीने ढकलल्या गेलेल्या ज्या महिलांची सुटका केली गेली त्यातील ही महिला आहे. तिचे अंगावर पिणारे दीड वर्षाचे मूलही आहे.
सुटका केलेल्या या मुलीचे पुढे काय करायचे याविषयी आदेश घेण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला. त्यावर पंढरपूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ‘प्रोबेशन आॅफिसर’चा अहवाल मागवून या महिलेस एक वर्षासाठी बारामती येथील प्रेरणा वसतिगृहात ठेवण्याचा आदेश दिला. हा आदेश नंतर अपिलात सत्र न्यायालया९नही कायम केला. त्यानुसार या महिलेचे वास्तव्य गेले सहा महिने बारामतीच्या वसतिगृहात होते. स्वत:ला या महिलेची ‘मानलेली आई’ म्हणविणाºया आशिया अन्वर शेख (तकाई नगर, दौंड, पुणे) हिने याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका केली व सुटका केलेल्या या महिलेला आपल्याकडे सुपूर्द करावे, अशी मागणी केली. सुटका केलेली ही महिला त्या लॉजवर वेश्याव्यवसाय करत नव्हती तर स्वयंपाकी म्हणून काम करत होती, असा तिचा दावा होता.
सुटका केलेली ही मुलगी सज्ञान आहे त्यामुळे तिच्या मनाविरुद्ध तिला सुधारगृहात डांबणे चुकीचे आहे, हा याचिकाकर्तीने मांडलेला मुद्दा न्या. एस.ऐस. शिंदे यांनी मान्य केला. मात्र तरीही त्यांनी त्या महिलेला आशिया शेख यांच्या ताब्यात देण्यास नकार दिला.
>निर्णय ‘तिच्या’वरच सोपविला
न्या. शिंदे यांनी सत्र न्यायालयाच्या अनिकालात बदल करून सुटका कलेल्या महिलेचे वसतिगृहातील सहा महिन्यांचे झाले तेवढे वास्तव्य पुरेसे ठरविले. तिला वसतिगृहातून सोडण्यात यावे. मात्र त्यानंतर पुन्हा वसतिगृहात राहायचे की कुठे राहायचे याचा निर्णय तिचा तिने घ्यावा, असा आदेश त्यांनी दिला.

Web Title: Rejected to give 'mother' to mother, who was released from prostitution business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.