तिहेरी तलाक अध्यादेशाला आव्हान देणार - रझा अकादमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 06:36 AM2018-09-23T06:36:44+5:302018-09-23T06:37:03+5:30

केंद्र सरकारने तिहेरी तलाकबाबत काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असून, लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रझा अकादमीचे प्रमुख मौलाना सईद नूरी यांनी दिली.

Raza Academy will challenge Triple talaq ordinance | तिहेरी तलाक अध्यादेशाला आव्हान देणार - रझा अकादमी

तिहेरी तलाक अध्यादेशाला आव्हान देणार - रझा अकादमी

googlenewsNext

मुंबई  - केंद्र सरकारने तिहेरी तलाकबाबत काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असून, लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रझा अकादमीचे प्रमुख मौलाना सईद नूरी यांनी दिली. मुस्लीम समाजातील मौलाना व विचारवंतांची बैठक नुकतीच पार पडली, त्यामध्ये यावर चर्चा झाली.
सईद नूरी म्हणाले, हा अध्यादेश म्हणजे मुस्लीम समाजाच्या धार्मिक बाबतीत सरकारचा हस्तक्षेप असून, केंद्र सरकार जाणीवपूर्वक मुस्लीम समाजाच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करत आहे. आम्ही याबाबत गप्प बसणार नाही, तर या अध्यादेशाला विरोध करून, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबत आमचा सध्या विचारविनिमय सुरू आहे.
केंद्र सरकारचा हेतू स्वच्छ नसून, या अध्यादेशाच्या माध्यमातून मुस्लीम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोरक्षेच्या नावावर मुस्लिमांना छळण्यात येत असून, अशा प्रकारच्या घटना भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशाला अशोभनीय असल्याची टीकादेखील त्यांनी यावेळी केली.
सातत्याने होणाऱ्या अशा घटनांमुळे भारतात एकत्र आणि आनंदाने नांदणाºया दोन समाजांमध्ये तेढ वाढत चालली आहे. संविधानाच्या विविध तरतुदींना धाब्यावर बसविले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

भाविकांची लूट
मक्का व मदिनामध्ये दुसºयांदा जाणाºया भाविकांकडून २ हजार रियाल फी स्वरूपात घेण्याच्या सौदी अरेबिया सरकारच्या निर्णयाचा त्यांनी निषेध केला. ही भाविकांची लूट असून, हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत सौदी अरेबियाच्या मुंबई व दिल्लीतील दूतावासाशी संपर्क साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Raza Academy will challenge Triple talaq ordinance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.