दहिसरमध्ये महिलेचे अपहरण करून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 01:06 AM2019-03-10T01:06:57+5:302019-03-10T01:07:12+5:30

अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Rape of a woman abducted in Dahisar | दहिसरमध्ये महिलेचे अपहरण करून बलात्कार

दहिसरमध्ये महिलेचे अपहरण करून बलात्कार

Next

मुंबई : घरकाम करणाऱ्या महिलेचे अपहरण करून तिला शितपेयातून गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर गोराई बीच परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्या अत्याचाराचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या शनिवारी आवळण्यात आल्या. गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ११ ने ही कारवाई केली.

मंगेश बनववारीलाल गुप्ता (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो रिक्षाचालक आहे. त्याच्याच शेजारी राहणारी सीमा ( नावात बदल ) हिला रिक्षात बसवून गुंगीचे औषध असलेले शीतपेय प्यायला दिले. त्यानंतर गोराईतील एका हॉटेलमध्ये तिला नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराचे त्याने व्हिडीओ शुटिंग केले. त्यानंतर याबाबत कुठेच वाच्यता करू नको, अशी धमकी गुप्ताने सीमाला दिली. बदनामीच्या भीतीने तिने याबाबत तक्रार केली नाही. मात्र नंतर त्याने त्याच व्हिडीओचा फायदा घेत तिला ब्लॅकमेल करुन वारंवार तिच्यावर अत्याचार करण्यास सुरवात केली. त्यामुळे कंटाळुन सीमाने दहिसर पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल केली. हे प्रकरण नंतर एमएचबी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेचे कक्ष ११ चौकशी करत होते. गुप्ता चारकोप मार्केट परिसरात येणार असल्याची माहिती या कक्षाचे प्रमुख चिमाजी आढाव यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तेकर आणि पथकाने सापळा या परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. पुढील चौकशीसाठी त्याला एमचबी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: Rape of a woman abducted in Dahisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.