चेंगराचेंगरी न होण्यासाठी रेल्वेची उपाययोजना, जवानांची फौज तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 12:19 AM2019-05-31T00:19:10+5:302019-05-31T00:19:34+5:30

गर्दीच्या स्थानकावर सीसीटीव्ही, ड्रोन हे तिसऱ्या डोळ्याचे काम करणार आहेत. पावसाळ्यात स्थानकावर, पादचारी पूल यावर कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी सर्व सुरक्षा विभाग सतर्क राहणार आहे.

Railways to take steps to prevent stampede, to deploy army of soldiers | चेंगराचेंगरी न होण्यासाठी रेल्वेची उपाययोजना, जवानांची फौज तैनात

चेंगराचेंगरी न होण्यासाठी रेल्वेची उपाययोजना, जवानांची फौज तैनात

Next

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात लोकल सेवा उशिराने आणि ठप्प होते. परिणामी, तब्बल ४० ते ५० मिनिटे प्रवाशांना लोकलची वाट बघावी लागते. यामुळे स्थानकावर गर्दी जमा होते़ चेंगराचेंगरीत होते. या वर्षी असे होऊ नये, यासाठी सुरक्षा विभागाने कंबर कसली आहे.
पावसाळ्यात गर्दीचे नियोजन आणि गर्दी विभाजित करण्यासाठी सुरक्षा विभागाला प्रत्येक स्थानकावर तैनात करण्यात येणार आहे. रेल्वे सुरक्षा बल, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड, लोहमार्ग पोलीस आपली चोख जबाबदारी पार पाडणार आहेत.

रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये, चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि रेल्वे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात बुधवारी कार्यशाळेचे आयोजन केले होते. रेल्वे स्थानकावरील गर्दीचे नियंत्रण, व्यवस्थापन, आपत्कालीन घटनेशी कसा लढा द्यावा, याविषयी महाराष्ट्र पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ए. जगनाथन यांनी मार्गदर्शन केले.
मध्य रेल्वे आरपीएफच्या मुंबई विभागात १ हजार ८५० जवान आहेत. यापैकी ५५० रेल्वे सुरक्षा बलाचे ५५० जवान आणि अधिकारी असणार आहेत. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५१ अधिकारी आणि कर्मचारी असणार आहे. मान्सूनमध्ये मध्य रेल्वे मार्गावरील गर्दीच्या स्थानकावर एकूण ८०१ अधिकारी आणि कर्मचारांना तैनात केले जाणार आहे. यासह मुंबईतील सामाजिक संस्थांना, स्वयंसेवकांना उभे केले जाणार आहे. पावसाचे पाणी भरल्याने गर्दीचे प्रमाण एका ठिकाणी वाढते. त्यामुळे एका ठिकाणी जास्त गर्दी झाल्यास उद्घोषणेद्वारे गर्दी कमी करण्याची घोषणा केली जाणार आहे.

गर्दीच्या स्थानकावर सीसीटीव्ही, ड्रोन हे तिसऱ्या डोळ्याचे काम करणार आहेत. पावसाळ्यात स्थानकावर, पादचारी पूल यावर कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी सर्व सुरक्षा विभाग सतर्क राहणार आहे.

जवानांची फौज तैनात
मध्य रेल्वे आरपीएफच्या मुंबई विभागात १ हजार ८५० जवान आहेत. यापैकी ५५० रेल्वे सुरक्षा बलाचे ५५० जवान आणि अधिकारी असणार आहेत. यासह यांना साहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५१ अधिकारी आणि कर्मचारी असणार आहे.

Web Title: Railways to take steps to prevent stampede, to deploy army of soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे