राफेलचा पहिला बळी; पर्रीकरांना श्रद्धांजली वाहताना जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:04 PM2019-03-18T18:04:17+5:302019-03-18T21:24:34+5:30

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे कर्करागाच्या आजाराने पीडित होते.

Rafale first victim; Jitendra Awhad's controversial statement while carrying homage to Parrikar | राफेलचा पहिला बळी; पर्रीकरांना श्रद्धांजली वाहताना जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान

राफेलचा पहिला बळी; पर्रीकरांना श्रद्धांजली वाहताना जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान

googlenewsNext

मुंबई - देशभरातून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली वाहिली, त्यांच्या कामाचे कौतुक केले. मात्र, श्रद्धांजली वाहिल्यानंतर पुन्हा बोलताना, 'माझ्या अंदाजे 'हा' राफेलचा पहिला बळी गेला', असे वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.   

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे कर्करागाच्या आजाराने पीडित होते. गेल्या वर्षभरापासून पर्रीकर यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबई, नवी दिल्ली, न्यू यॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र या काळातही ते काम करत होते. 27 जानेवारीला पणजीतील सिग्नेचर ब्रिजचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला पर्रीकर उपस्थित होते. त्यानंतर तीनच दिवसानंतर 30 जानेवारीला त्यांनी गोव्याचा अर्थसंकल्प सादर केला. नाकात नळ्या असतानाही त्यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या निधनानं देशभरातून शोक व्यक्त होत आहे. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी पर्रीकरांचे निधन हे माझ्या अंदाजे राफेलचा पहिला बळी आहे, असे म्हटले. शरद पवार देशाचे संरक्षणमंत्री असताना 4 वेळा सर्जिकल झाला होता. मात्र, त्याचा कधीही गवगवा केला, असे सांगता सरकारकडून राजकीय फायद्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचं राजकारण केलं जात असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.   

''मी 4 ते 5 वेळा त्यांना भेटलो होते. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. पण, माझं असं वैयक्तिक मत आहे की, राफेलची बोलणी सुरू असताना अस्वस्थ असलेल्या पर्रीकरांनी दिल्लीचं राजकारण आपल्याला जमणार नाही, हे ओळखून गोव्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले, ते परत कधी दिल्लीला गेलेच नाही. त्यांच्या मनातल्या वेदना त्यांनी अनेक मित्रांसोबत बोलून दाखवल्या होत्या. आता, मरणानंतर कोणावरती बोलू नये, पण माझ्या अंदाजाने हा राफेलचा पहिला बळी गेला'', असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना पर्रीकरांना 4 ते 5 वेळा भेटल्याचेही त्यांनी सांगितले.  


पाहा व्हिडीओ -

Web Title: Rafale first victim; Jitendra Awhad's controversial statement while carrying homage to Parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.