पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी धर्मगुरू एकाच छताखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 04:38 AM2019-05-13T04:38:40+5:302019-05-13T04:40:07+5:30

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अहिंसा विश्व भारती संस्थेतर्फे ‘पर्यावरण संरक्षण, संवर्धन व प्रदूषण’ या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथील एनएससीआय डोम येथे ५ जून रोजी हा कार्यक्रम होईल.

 For the protection and conservation of the ecosystem, the monastery under one roof | पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी धर्मगुरू एकाच छताखाली

पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी धर्मगुरू एकाच छताखाली

Next

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अहिंसा विश्व भारती संस्थेतर्फे ‘पर्यावरण संरक्षण, संवर्धन व प्रदूषण’ या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथील एनएससीआय डोम येथे ५ जून रोजी हा कार्यक्रम होईल. महत्त्वाचे म्हणजे, यावेळी पर्यावरणासाठी पहिल्यांदा विश्वविख्यात धर्मगुरू एकाच छताखाली येऊन मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, इशा फाउंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुदेव, पतंजली योगपीठाचे संस्थापक योग ऋषी रामदेव बाबा, ब्रह्मकुमारी परिवारातून डॉ. बीके शिवानी या उपस्थिताना मार्गदर्शन करतील.
अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी या संदर्भात सांगितले की, ज्याप्रमाणे पृथ्वीचे तापमान वाढत असून बर्फ वितळत आहे आणि ओझोन वायूचा थर कमी होत चालला आहे. जर का ही अवस्था कायम राहिली, तर पृथ्वीवर प्राणिमात्रांचे जगणे मुश्कील होईल. दिल्लीमध्ये दिवाळीच्या दिवशी होत असलेल्या प्रदूषणामुळे एका दिवसात शंभर सिगारेटचा धूर फुप्फुसामध्ये जात असतो, तसेच देशभरातमध्ये पाण्याची टंचाई सुरू असून, स्थानिक लोक दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे या समस्या आपल्याला चिंतेत टाकत आहेत. सर्व धर्मगुरूंचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी लोकांचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करावे. यासाठी अहिंसा विश्व भारती संस्थेच्या वतीने पर्यावरणाच्या संवर्धन, संरक्षण व प्रदूषणावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पाच हजारांहून अधिक लोक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
प्रदूषणाबाबत लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करणे आणि प्रत्येक व्यक्ती आपले योगदान कसे देईल, यासाठी त्याला प्रोत्साहित करण्याचा मुख्य उद्देश या परिषदेचा आहे. कार्यक्रमाला येणारे पाच हजार लोक हे चार धर्मगुरूंचे मार्गदर्शन घेतील. त्यावेळी त्यांनी समाजात पर्यावरणदूत म्हणून काम करावे, तसेच जी व्यक्ती पर्यावरणासाठी काम करत असेल, त्यांचा सन्मान करून त्यांना जगासमोर आणण्याचे काम संस्था करणार आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व वनस्पती हे सजीव आहेत. यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. गरजेपेक्षा जास्त उपयोग करू नये. धरती माता ही आपल्या गरजा पुर्ण करू शकते, परंतु आपल्या वाढत्या इच्छा, लालच, आकांक्षा याची पूर्ती करू शकत नाही. पदार्थ समित असून, इच्छा असिम आहेत. त्यामुळे भोग आणि उपभोगाची सीमा असली पाहिजे. रस्त्यावर गाड्यांची संख्या इतकी वाढली आहे की, माणसांना रस्त्यावरून चालण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. वृक्षांची होणार कत्तल, वृक्ष लागवडीसाठी लोकांमध्ये जनजागृती अभाव आहे. या समस्या चांगल्या पद्धतीने तरुणांच्या समोर मांडल्या गेल्या, तर त्यातून बदल नक्कीच घडू शकतो, असेही आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी सांगितले.



तयारी जोमाने सुरू
पर्यावरण कार्यक्रमाची तयारी ही जोमाने सुरू असून, नुकतीच आयोजकांची बैठक पार पडली. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती सहभागी होणार आहे, तसेच सहभागासाठी एक संकेतस्थळ तयार करण्यात आले असून, त्यावर आतापर्यंत पाच दिवसांत हजारांच्या संख्येने नोंदणी झाली आहे. सर्व स्तरावरील प्रसारमाध्यमे सहभागी होत असून, एक प्रकारचे आंदोलन निर्माण झाले पाहिजे. यातून लोकांचे विचार, दृष्टिकोनात बदल झाला पाहिजे आणि पर्यावरणावर त्याचे असिम प्रेम निर्माण होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

पर्यावरण विषय पाठ्यपुस्तकात असावा
पर्यावरण परिषदेमध्ये सर्व क्षेत्रातील लोकांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमात जास्त तरुण वर्ग येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तसेच यावेळी पर्यावरण धोरणाबाबतही चर्चा केली जाणार आहे. शालेय व महाविद्यालयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये पर्यावरणाचा समावेश असावा, अशी मागणी सरकारकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

याचा विचार करावा
पृथ्वी ही आवश्यक गोष्टीची पूर्ती करून शकते, त्यामुळे आपल्या जीवनशैलीला निसर्गाच्या अनुरूप बनविणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे खनिज तेलाचा बेसुमार वापर होतोय. विकासकामांसाठी वृक्षांची कत्तल सुरू आहे. याची पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. यावर नागरिकांनी चिंतन, मनन करून जीवनशैलीला निसर्गाच्या अनुरूप बनविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

परिषदेत ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा
ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा जगाचा झाला आहे. या समस्येमुळे संपुर्ण जग दु:खात आहे. ज्याप्रमाणे पृथ्वीचे तापमान वाढत असून, बर्फ वितळतोय आणि ओझोनचा थर कमी होतोय, तर यासाठी योग्य पाऊन उचलून काहीतरी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे या समस्येवर मार्गदर्शन करण्यास सर्व धर्मगुरू एकत्र आले आल्याचा तपशील त्यांनी दिला.

Web Title:  For the protection and conservation of the ecosystem, the monastery under one roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई