लोअर परळमधील म्हाडाच्या एका घराची किंमत तब्बल 2 कोटी रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 12:26 PM2017-09-15T12:26:25+5:302017-09-15T15:39:35+5:30

सर्वसामान्य मुंबईकरांचं घराचं स्वप्नं साकार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या म्हाडाची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.

The price of one house in Lower Parel is about Rs 2 crore | लोअर परळमधील म्हाडाच्या एका घराची किंमत तब्बल 2 कोटी रूपये

लोअर परळमधील म्हाडाच्या एका घराची किंमत तब्बल 2 कोटी रूपये

Next
ठळक मुद्देसर्वसामान्य मुंबईकरांचं घराचं स्वप्नं साकार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या म्हाडाची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.म्हाडाची घरं सर्वसामान्यांच्या खिशाच्या परवडणारी असतात, असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण असं वाटणाऱ्यांचा काहीसा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. लोअर परळमधील म्हाडाच्या एका घराची किंमत तब्बल दीड ते दोन कोटी रुपये इतकी आहे.

मुंबई, दि. 15- सर्वसामान्य मुंबईकरांचं घराचं स्वप्नं साकार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या म्हाडाची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. म्हाडाची घरं सर्वसामान्यांच्या खिशाच्या परवडणारी असतात, असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण असं वाटणाऱ्यांचा काहीसा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. लोअर परळमधील म्हाडाच्या एका घराची किंमत तब्बल दीड ते दोन कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळं मुंबईत घराचं स्वप्नं पाहणाऱ्या मुंबईकरांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.

म्हाडाच्या ८१९ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून 16 सप्टेंबरपासून घरासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे.  यापैकी २०४ घरांची किंमत तब्बल दीड ते दोन कोटींच्या आसपास आहे. म्हाडाच्या जाहिरातीनुसार, लोअर परळमधील उच्च उत्पन्न घटातील दोन घराची किंमत प्रत्येकी दोन कोटीच्या जवळपास आहे. 475 स्क्वेअर फूट असलेल्या एका घराची किंमत तब्बल १ कोटी ९५ लाख ६७ हजार १०३ रुपये इतकी आहे. तर लोअर परळमधील 364 स्क्वेअर फूट घरासाठी १ कोटी ४२ लाख ९६ हजार ५१७ रुपये इतकी आहे. उच्च उत्पन्न गटात दीड कोटी रुपये किंमत असलेली ३४ घरे लोअर परळमध्येच आहेत. या घरांसाठी १६ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज करता येऊ शकणार असून १० नोव्हेंबरला लॉटरी निघणार आहे. महिन्याला दीड लाखांच्यावर पगार घेणाऱ्या तसेच भत्ता, रेल्वे, एसटी, रुग्णालयात सवलत मिळणाऱ्या आणि मुंबईत आमदार निवास असलेल्या आमदारांना म्हाडानं अल्प गटात राखीव घरं ठेवली आहेत. 

यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षानगर-सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरीवली येथील आठ सदनिकांचा समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता कन्नमवारनगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थनगर-गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड येथील १९२ सदनिकांचा समावेश आहे. 

मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रतीक्षानगर-सायन, सिद्धार्थनगर-गोरेगाव (पश्चिम), उन्नतनगर-गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाडनगर-मालवणी मालाड येथील एकूण २८१ सदनिकांचा समावेश आहे. उच्च उत्पन्न गटाकरिता लोअर परेल, तुंगा-पवई, चारकोप कांदिवली (पश्चिम), शिंपोली-कांदिवली (पश्चिम) येथील एकूण ३३८ सदनिकांचा समावेश आहे, अशी माहिती म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली.

अत्यल्प उत्पन्न गटाकरिता १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीमध्ये असलेले अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती+पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) २५ हजार रुपयांपर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता २५,००१ ते ५०,००० रुपयांपर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता ५०,००१ ते ७५,००० रुपयांपर्यंत तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे ७५,००१ रुपयांपर्यंत वा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विनापरतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता १५,३३६ रुपये प्रति अर्ज आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता २५,३३६ रुपये प्रति अर्ज आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता ५०,३३६ रुपये प्रति अर्ज आहे.
उच्च उत्पन्न गटाकरिता ७५,३३६ रक्कम प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाइन अर्जापोटी प्रति अर्ज ३३६ रुपये (विनापरतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे.

नोंदणी २१ ऑक्टोबरपर्यंत करता येणार
माहितीपुस्तिका व ऑनलाइन अर्ज म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नोंदणी १६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून २१ ऑक्टोबर रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत करता येईल. नोंदणीकृत अर्जदारास नोंद माहितीमध्ये १६ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते २२ ऑक्टोबर रोजीच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत बदल करता येईल. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते २२ आॅक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

बँकेत डीडी स्वीकृती १७ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर या कालावधीत केली जाणार आहे. यंदा प्रथमच अर्जदारांना एनईएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याद्वारे चलन निर्मिती १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून २३ आॅक्टोबरपर्यंतच्या रात्री १२ पर्यंत करता येणार आहे.

एनईएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी १७ सप्टेंबरच्या दुपारी २ वाजल्यापासून २४ ऑक्टोबरच्या रात्री १२ पर्यंत कालावधी असणार आहे. डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते २४ आॅक्टोबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे.
 

Web Title: The price of one house in Lower Parel is about Rs 2 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.