नववर्ष स्वागतासाठी हॉटेल्स ऐवजी 'हाऊस पार्टी'ला पसंती; पर्यटकांच्या खिशाला सेलिब्रेशनचे बजेट न परवडणारे

By स्नेहा मोरे | Published: December 26, 2023 07:42 PM2023-12-26T19:42:32+5:302023-12-26T19:42:54+5:30

नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

Preference for house party instead of hotels for welcoming New Year Celebration budget unaffordable for tourists' pockets | नववर्ष स्वागतासाठी हॉटेल्स ऐवजी 'हाऊस पार्टी'ला पसंती; पर्यटकांच्या खिशाला सेलिब्रेशनचे बजेट न परवडणारे

नववर्ष स्वागतासाठी हॉटेल्स ऐवजी 'हाऊस पार्टी'ला पसंती; पर्यटकांच्या खिशाला सेलिब्रेशनचे बजेट न परवडणारे

मुंबई: नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी हॉटेल्सच्या तुलनेत हाऊसपार्टी, व्हिला आणि बंगले बुक करण्याला अधिक पसंती दिली आहे. काही वर्षांत हॉटेल्समधील खाणेपिणेही महाग झाले आहे. त्यामुळे तेथील सेलिब्रेशनचे बजेट अनेक पर्यटकांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे पर्यटक पार्ट्यांसाठी वेगवेगळे पर्याय निवडत आहेत.

काही वर्षांपूर्वी हॉटेल बुक करुन ३१ डिसेंबरच्या पार्टी करण्याकडे पर्यटकांचा कल होता, मात्र आता हेच चित्र पालटले असून मुंबईपासून अवघ्या दोन-तीन तासांवर असलेल्या अनेक पर्यटनस्थळांकडे अगदी गावांतील होम स्टेकडे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. अशा सेलिब्रेशनमध्ये थीम पार्टी, गेम नाईट, मूव्ही नाईट्स आयोजित करून सहकुटुंब आणि मित्र- मैत्रिणी फुल टू धमाल करताना दिसातात. यात कर्नाळा, अलिबाग, लोणावळा, खंडाळा, कर्जत, भिवपुरी, बोर्डी, गुहागर, ताडोबा, महाबळेश्वर, ताम्हीणी, पौड, पाबे, वेल्हा, मुळशी, तळेगाव, आतकरवाडी , रेवदंडा, उत्तन, आक्सा, भंडारदरा अशा अगदी जवळच्या ठिकाणी पर्यटकांचे बुकिंग वाढत आहे. तसेच बहुतांश लोकांनी नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी राज्यभरातील बंगले, फार्म हाउसचा पर्याय निवडला आहे. येथे पर्यटकांसाठी येथे चुलीवरचे गावरान जेवण, शेकोटी, सकाळी जंगलात भटकंती असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. या ठिकाणी सेलिब्रेशनसाठी हाॅटेलच्या तुलनेत कमी बजेट लागते आणि करही कमी द्यावा लागतो. मर्यादित वेळेतच नववर्षाचे सेलिब्रेशन, पार्टी संपवावी, अशी बंधने नसल्याने मोठ्या संख्येने पर्यटक फार्म हाउस, बंगल्यांचा पर्याय निवडत आहेत. - चंद्रशेखर जयस्वाल, व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

तिहेरी सुट्टीमुळे फुल टू धमाल
शहरानजीकच्या फार्म हाउसवर सहकुटुंबासमवेत धमाल... तर कोणी समुद्रकिनाऱ्यांवर निवांत बसून, मित्रमैत्रिणींच्या घरी गप्पांसाठी जाण्याचे... लाँग डाइव्हची मजा करून सरत्या वर्षाला निरोप देण्याचे नियोजन मुंबईकरांनी केले आहे. त्यामुळे शनिवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून अनेक मंडळींचे सकाळीच भटकंतीसाठी घराबाहेर पडण्याचे नियोजन आहे. यावर्षी ३१ डिसेंबर रविवारी आल्यामुळे अनेकांना शनिवार ते सोमवार अशी तिहेरी सुट्टी मिळाल्याने निसर्गाच्या सान्निध्यात नव्या वर्षाचे स्वागत करण्याचे बेत अनेकांनी आखले आहेत.

Web Title: Preference for house party instead of hotels for welcoming New Year Celebration budget unaffordable for tourists' pockets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई