टपाल खाते नववर्षात विविध उपक्रम राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 02:53 AM2019-01-01T02:53:08+5:302019-01-01T02:53:24+5:30

देशाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती व महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती तरुणाई व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘रोमान्स आॅफ स्टॅम्प’ हा उपक्रम टपाल खात्यामार्फत नवीन वर्षापासून राबविण्यात येणार आहे.

 The postal department will undertake various activities in the new year | टपाल खाते नववर्षात विविध उपक्रम राबविणार

टपाल खाते नववर्षात विविध उपक्रम राबविणार

Next

- खलील गिरकर

मुंबई : देशाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती व महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती तरुणाई व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘रोमान्स आॅफ स्टॅम्प’ हा उपक्रम टपाल खात्यामार्फत नवीन वर्षापासून राबविण्यात येणार आहे.
मुंबईत दरवर्षी अनेक महोत्सव होतात. अशा महोत्सवांमध्ये टपाल खाते आपल्या स्टॅम्पबाबत माहिती देऊन जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती टपाल खात्याच्या मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांनी दिली.
काळाघोडा महोत्सवासह विविध महोत्सवांमध्ये टपाल खाते आपला स्टॉल लावून टपाल तिकिटांबाबत नागरिकांना सजग करेल. तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तुंना स्टॅम्पचे आवरण लावून अधिकाधिक जणांना याकडे आकर्षित करण्यात येणार आहे.
‘टपाल खात्याच्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय मुत्सद्दीपणा’ या थीमवर नोटबुकच्या पॅटर्नमध्ये डायरी बनविण्यात येणार आहे. टपाल तिकिटे ही देशातील घटनांचा आरसा असतात. भारतीय इतिहासाचे डॉक्युमेंटशन याद्वारे नागरिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुंबई विभागाच्या ुपोस्ट मास्टार जनरल स्वाती पांडे यांनी स्पष्ट केले. टपाल खात्यातर्फे अनेक योजना राबविण्यात येतात, आम्ही त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांचा सहभाग यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही, पांडे यांनी स्पष्ट केले.
मुंबई विभागाच्या टपाल खात्याच्या संचालिका केया अरोरा म्हणाल्या, ‘फिलॅटॅली विभागातर्फे आम्ही विविध तिकिटांचे प्रदर्शन भरविण्याचा आमचा मनोदय आहे. यासाठी विविध कल्पक योजना राबवून तरुणांपर्यंत पोहोचणार आहोत.

Web Title:  The postal department will undertake various activities in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.