पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यावर दिसणार सुटातील महिलेचे चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 05:46 AM2019-05-28T05:46:03+5:302019-05-28T05:46:12+5:30

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या महिला डब्यावर आता सुटातील आधुनिक महिलेचे चित्र दिसून येणार आहे.

Picture of a woman in a Western Railway woman box | पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यावर दिसणार सुटातील महिलेचे चित्र

पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यावर दिसणार सुटातील महिलेचे चित्र

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या महिला डब्यावर आता सुटातील आधुनिक महिलेचे चित्र दिसून येणार आहे. याआधी महिला डब्यावर साडी आणि पदर घेतलेल्या महिलेचे चित्र होते. आता फॉर्मल पेहराव केलेली महिला दिसणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील ११० लोकलच्या महिला डब्यांवर पेंटिंग केले जाणार आहे.
कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये महिला मोठ्या संख्येने काम करीत आहेत. या महिला फॉर्मल पेहरावात दिसून येतात. त्यामुळे लोकलच्या डब्यांवर आधुनिक महिलेचे चित्र रेखाटण्यात आले आहे. या चित्रामुळे आधुनिक महिलेचे प्रतिनिधित्व होते असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महिला डब्यावर कोणते चित्र असावे, यासाठी अनेक चित्रांचे निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर पश्चिम रेल्वेने आधुनिक महिलांचे प्रतिनिधित्व करणाºया मॉडेल महिलेचे चित्र लावण्याचा निर्णय घेतला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भविष्यात महिलांच्या डब्यात बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल, क्रिकेटपटू मिताली राज आणि अंतराळवीर कल्पना चावला यांची छायाचित्रे दिसणार आहेत.
दिव्यांग डबा स्पष्टपणे दिसून यावा, यासाठी दिव्यांगाचा संपूर्ण डबा पिवळ्या रंगाने रंगविण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांगांचा डबा लवकर दृष्टीस येईल, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.
दरम्यान, लोकलच्या महिला डब्यामध्ये आरसा लावण्याची मागणी महिला संघटनाकडून करण्यात येत आहे.
>सध्या पश्चिम रेल्वेने नवे लोगो असलेले १२ डबे तयार केले आहेत. त्यापैकी ५१०५ आणि ५१०६ या डब्यांवर ही छायाचित्रे आहेत. तर ५११७ व ६०३३ हे २ डबे लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली.

Web Title: Picture of a woman in a Western Railway woman box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.