पॅनकार्ड क्लब संघटनेचा आझाद मैदान येथे मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 01:35 PM2018-01-30T13:35:15+5:302018-01-30T14:03:16+5:30

पॅनकार्ड क्लब संघटनेन आझाद मैदान येथे मोर्चा सुरू केला आहे.

PanCard Club Association at Azad Maidan | पॅनकार्ड क्लब संघटनेचा आझाद मैदान येथे मोर्चा

पॅनकार्ड क्लब संघटनेचा आझाद मैदान येथे मोर्चा

googlenewsNext

मुंबई- पॅनकार्ड क्लब संघटनेन आझाद मैदान येथे मोर्चा सुरू केला आहे. गुंतवणुकदारांच्या वतीने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सदर आंदोलन हे कुठल्याही राजकीय पक्षाविरूध्द नाही. केंद्र सरकार, अर्थ मंत्रालय आणि सेबीच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. देशात  ५१ लाख ५५ हजार ५१६ गुंतवणूकदार आहेत. त्यांनी कॉपनीत  ७ हजार ०३४ कोटी रुपये गुंतवले आहे त्याबदल्यात गुंतवणूकदारांना १२ हजार ३६० कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहेत त्यातील आत्तापर्यंत ४ हजार ०१६ कोटी रुपये मिळाले आहेत. तर ८ हजार ३४४ कोटी रुपये मिळणे बाकी आहे.

20 डिसेंबरला RICOC सहित खासदारांच्या शिष्टमंडळाला 8 दिवसाचं आश्वासन दिले. मात्र आजवर कसलाच प्रतिसाद नाही.
अत्यंत तळमळीने आणि पोटतिडकीने गुंतवणुकदार दिल्लीपर्यंत लढा देताहेत. मुख्यमंत्र्यांचा, अर्थमंत्र्याचा पाठपुरावा करताहेत.  माजी न्यायमूर्ती सन्मा.बी जी कोळसेपाटील, स्वत: आण्णाजी हजारे पण सरकारची भूमिका चुकीची असल्याचे सांगताहेत.
तरी सुध्दा असंवेदनशील सरकार दखल घेत नाही. सामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.. मग आम्ही न्याय कुठे मागायचा?म्हणूनच हे आंदोलन उभारले आहे. यापुढेही सरकारला जाग आली नाही, तर सर्वसामान्य जनता काय करू शकते, हे दाखवायची धमक सुध्दा आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

Web Title: PanCard Club Association at Azad Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.