राज्यात ४० रुग्णांना हवे हृदयाचे दान; देशात दोन वर्षांत फक्त ३०० हृदय प्रत्यारोपण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 07:38 AM2018-09-29T07:38:21+5:302018-09-29T07:38:48+5:30

अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी, याकरिता शासकीय पातळ्यांपासून स्वयंसेवी संस्थाही प्रयत्नशील आहेत. मात्र, असे असूनही राज्यात आजमितीस ४० रुग्ण हृदयप्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत.

Only 300 heart transplants in the country in two years | राज्यात ४० रुग्णांना हवे हृदयाचे दान; देशात दोन वर्षांत फक्त ३०० हृदय प्रत्यारोपण

राज्यात ४० रुग्णांना हवे हृदयाचे दान; देशात दोन वर्षांत फक्त ३०० हृदय प्रत्यारोपण

Next

- स्नेहा मोरे
मुंबई -अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी, याकरिता शासकीय पातळ्यांपासून स्वयंसेवी संस्थाही प्रयत्नशील आहेत. मात्र, असे असूनही राज्यात आजमितीस ४० रुग्ण हृदयप्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत.
नॅशनल आॅर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांटेशन आॅर्गनायझेशनच्या अहवालानुसार, गेल्या दोन वर्षांत देशात केवळ ३०० हृदय प्रत्यारोपण पार पडले आहेत. आपल्याकडे अवयवदात्यांची असलेली कमतरता ही अवयव प्रत्यारोपणाच्या मार्गातील प्रमुख समस्या आहे. जागरूकतेचा अभाव, अवयवदान, प्रत्यारोपणासाठी अपुऱ्या सुविधा, यामुळे अवयवदानाचा वेग कमी आहे. जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुंबईच्या समन्वयक ऊर्मिला महाजन यांनी सांगितले की, मुंबईत २३ रुग्ण हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत, तर नागपूर व औरंगाबादमध्ये एकही रुग्ण नाही. सध्या राज्यभरात ४० रुग्ण हृदयाची वाट पाहत आहेत. पुण्याच्या समन्वयक आरती गोखले म्हणाल्या, पुण्यात असे १७ रुग्ण आहेत.
नॅशनल आॅर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांटेशन आॅर्गनायझेशन संचालक डॉ. विमल भंडारी यांनी सांगितले की, देशातील प्रत्येक अवयवदान केंद्रात १० ते २० रुग्ण हृदयासाठी प्रतीक्षायादीत असल्याचे समजते. देशभरात दरवर्षी ४ ते ५ हजार लोकांना हृदय प्रत्यारोपणाची गरज असताना, केवळ १०० लोकांचे हृदय प्रत्यारोपण होऊ शकते. लोकांमध्ये अनेक गैरसमज असून ते दूर करणे गरजेचे आहे.

हैदराबाद शासनाचा आदर्श घ्यावा - डॉ. सरत चंद्र

आपल्याकडे ब्रेन डेडचे रुग्ण ओळखणे आणि त्यांचे प्रमाणीकरण करण्याची कोणतीही यंत्रणा रुग्णालयांकडे नाही. स्पेनमध्ये दहा लाख लोकांमागे ३५ लोक अवयवदान करणारे आहेत. ब्रिटनमध्ये ही संख्या दहा लाख लोकांमागे २७ आणि अमेरिकेत ११ लोक इतकी आहे, तर भारतात हेच प्रमाण केवळ ०.१६ लोक इतके अत्यल्प आहे.
आपल्याकडे अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आहेत. मात्र, त्यासोबतच हे प्रमाण कमी असण्यासाठी अन्य घटकही तितकेच जबाबदार आहेत.
हृदय प्रत्यारोपणासाठी येणारा खर्चही आवाक्याबाहेरचा असतो. बºयाच सामान्य कुटुंबातील लोकांना हे प्रत्यारोपण करणे शक्य होत नाही.
यावर उपाय म्हणून हैदराबादच्या शासनाने आर्थिक
भार उचलणारी योजना सुरू केली आहे, यात दहा लाखांपर्यंत रुग्णांना मदत केली जाते. त्यामुळे हैदराबाद शासनाचा आदर्श प्रत्येक राज्याने घ्यावा, जेणेकरून हे चित्र बदलण्यास मदत होईल, असे कॉर्डियोलॉजिकल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सरत चंद्र यांनी सांगितले.

Web Title: Only 300 heart transplants in the country in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.