चारकोपमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी निघाली उत्साहात

By मनोहर कुंभेजकर | Published: February 27, 2024 05:35 PM2024-02-27T17:35:43+5:302024-02-27T17:38:15+5:30

मुंबई - मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आजसकाळी ९ वाजता आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान व ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभाग यांच्या ...

On the occasion of Marathi bhasha gaurav din in Charkop mumbai | चारकोपमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी निघाली उत्साहात

चारकोपमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी निघाली उत्साहात

मुंबई - मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आजसकाळी ९ वाजता आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान व ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभाग यांच्या तर्फे आयोजन करण्यात आले होते.येथील चार शाळे मधील १५० विद्यार्थ्यांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग होता. लेझीम, ढोल वादनाने चैतन्य निर्माण झाले होते. झेंडा, मराठी  घोषवाक्ये यांनी प्रत्यक्षिकांनी लक्ष वेधले.यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी भाषा, ग्रंथ यांची महती सांगणारे घोषवाक्याचे फलक हाती घेत मराठीचा जागर केला.

ज्ञानवर्धिनी शाळेत पाहुण्यांचे स्वागत शुभेच्छाकार्ड देवून झाले. सजवलेल्या रथातून  ग्रंथ  पेटीची वाजत गाजत  दिंडी निघाली. समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चारकोप बस डेपो,मार्केट चारकोप सेक्टर 2 ,3,4,7,गणेश मंदिर  अशा मार्गाने ग्रंथ दिंडीचा प्रवास सुरू होता. चारकोप वासी यांनी या सुंदर सोहळ्याला दाद दिली. गणेश मंदिर येथे मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडीचा समारोप झाला.   

प्रथम कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन रजनी  साळुंखे व उषा वराडकर यांनी केले. प्रतिमा औक्षण  परिणिता माविनकुर्वे ,पुस्तक  पेटी पूजन.मुख्याध्यापक  राजाराम भोसले हणमंत नलावडे, महादेव भिंगार्डे व शिक्षक वर्ग , स्थानिक स्कूल यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले.  ग्रंथ तुमच्या दारी चे नारायण पवार व भाग्यश्री राऊत यांचे ही सहकार्य लाभले. उत्कृष्ट  नियोजन  घनश्याम  देटके अध्यक्ष आम्ही स्वावलंबी  प्रतिष्ठान यांचे होते.

दुसऱ्या सत्रात गणेश पूजन करून नवीन वाचन केंद्र अनावरण सोहळा पार पडला प्रास्ताविक परशुराम कदम यांनी केले .गणेश मंडळाकडून मान्यवर यांचा सत्कार शाल श्रीफळ व आरती पुस्तिका भेट देण्यात आली अपना बाझार चे संचालक हेमंत बिडवे व सदस्य आनंदराव साळुंखे, मदन चव्हाण, विठ्ठल घाग. आभार प्रदर्शन आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठानचे सदस्य संदीप जोशी यांनी केले.

आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठानचे सचिव संदीप  पिसाळ, कार्यकर्ते जयेश  पांचाळ,संदीप  जोशी.अंजली चांदोलीकर, अन्य  शिक्षिकांनी सोहळा संपन्न होण्यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न केले.

Web Title: On the occasion of Marathi bhasha gaurav din in Charkop mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.