प्लेटलेटदात्यांची संख्या वाढली; अ‍ॅपद्वारेही करता येईल नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 12:53 AM2019-02-13T00:53:51+5:302019-02-13T00:54:14+5:30

रक्तदानाविषयी आपल्याकडे सर्व स्तरावर जनजागृती आहे. मात्र रक्तातील घटक असणाऱ्या प्लेटलेट्स दानाविषयी अजूनही जनजागृती नाही, उलट अनेक गैरसमज आहेत.

 The number of platelet donors increased; The app can also be registered through the app | प्लेटलेटदात्यांची संख्या वाढली; अ‍ॅपद्वारेही करता येईल नोंदणी

प्लेटलेटदात्यांची संख्या वाढली; अ‍ॅपद्वारेही करता येईल नोंदणी

Next

मुंबई : रक्तदानाविषयी आपल्याकडे सर्व स्तरावर जनजागृती आहे. मात्र रक्तातील घटक असणाऱ्या प्लेटलेट्स दानाविषयी अजूनही जनजागृती नाही, उलट अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे आता टाटा मेमोरिअल आणि काही स्वयंसेवी संस्थांनी मिळून सुरू केलेल्या ‘सेव्ह अ लाइफ’ या उपक्रमाचे अ‍ॅपमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
टाटा मेमोरिअल सेंटर, नर्गिस दत्त मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्ट, इम्पॅक्ट फाउंडेशन व जी.जे. कपूर फाउंडेशनने मिळून ‘सेव्ह द लाइफ’ मोहिमेची २००९ मध्ये सुरुवात केली. सुरुवातील प्लेटलेट्स दात्यांची संख्या ११ टक्के इतकी होती. मात्र गेल्या १० वर्षांत या उपक्रमात पाच हजारांहून अधिक प्लेटलेट डोनर्स जोडले गेले असून आता ती संख्या ८७ टक्के झाल्याची माहिती बालरोग विभागाचे प्राध्यापक डॉ. तुषार व्होरा यांनी दिली.
टाटा मेमोरिअल अ‍ॅकॅडमिक्सचे संचालक आणि औषध व बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद बाणावली यांनी सांगितले की, देशाच्या कानाकोपºयातून दरवर्षी येथे ६० हजार रुग्ण येतात. त्यापैकी, तीन हजार बालरुग्ण असतात. बºयाच रुग्णांच्या मृत्यूचे कारण प्लेटलेट्स दानाचा अभाव हे आढळून आले आहे. मागणी - पुरवठ्याची दरी मिटविण्यास सेव्ह अ लाइफ या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले. त्याला यश मिळाले असून गेल्या वर्षी या माध्यमातून ३ हजार ८६४ प्लेटलेट्स युनिट्स दान केले आहेत. टाटा मेमोरिअलच्या ट्रान्सफ्युजन विभागाचे प्रमुख डॉ. सुनील राजाध्यक्ष यांनी सांगितले की, या उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीमुळे दर आठवड्याला प्लेटलेट्स दान करणारे अनेक ऐच्छिक दाते पुढे आले. प्लेटलेट्सच्या आवश्यकतेविषयी डॉ. राजाध्यक्ष म्हणाले की, मुलांना रक्ताचा कर्करोग झाल्यास दर सहा तासांनी प्लेटलेट्स बदलणे गरजेचे असते. यामुळे दात्यांची संख्या वाढणे महत्त्वाचे आहे.

दान करण्याची पद्धत
रुग्णाला प्लेटलेट्स स्वतंत्रपणे देता यावे, यासाठी मागील वर्षापासून ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’ पद्धत राबवली जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रक्तदात्याच्या एका हाताच्या मुख्य रक्तवाहिन्यांतून रक्त घेतल्यानंतर त्यातून प्लेटलेट्ससह हवे ते घटक काढून घेतले जातात. त्यानंतर उर्वरित रक्त दुसºया हाताच्या मुख्य रक्तवाहिनीद्वारे शरीरात पाठविले जाते. या नव्या तंत्रज्ञानामुळे किंवा प्लेटलेट्स दान केल्याने दात्यांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. दात्याचे वय १८ ते ५५ असणे बंधनकारक आहे.

Web Title:  The number of platelet donors increased; The app can also be registered through the app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.