आता नवउद्योजकांना मिळणार अर्थसाहाय्य; विद्यापीठात ‘आयडियाथॉन १.०’ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:40 AM2024-03-15T10:40:33+5:302024-03-15T10:41:41+5:30

मुंबई विद्यापीठाने नवकल्पना व नवसंशोधनांना स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्यासाठी ‘आयडियाथॉन १.०’ची घोषणा केली आहे.

now new entrepreneurs will get financial assistance announcement of ldeathon 1.0' in university of mumbai | आता नवउद्योजकांना मिळणार अर्थसाहाय्य; विद्यापीठात ‘आयडियाथॉन १.०’ची घोषणा

आता नवउद्योजकांना मिळणार अर्थसाहाय्य; विद्यापीठात ‘आयडियाथॉन १.०’ची घोषणा

मुंबई :मुंबईविद्यापीठाने नवकल्पना व नवसंशोधनांना स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्यासाठी ‘आयडियाथॉन १.०’ची घोषणा केली आहे. विद्यापीठाच्या एमयु- आयडियाज् इन्क्युबेशन सेंटरने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे नवउद्योजकांना मदत व अर्थसाहाय्य केले जाणार आहे. ‘आयडियाथॉन १.०’ च्या माध्यमातून नवउद्योजकांना त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य उपक्रमांमध्ये रूपांतर करण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

विद्यापीठात २०१९ पासून एमयु-आयडियाज् इन्क्युबेशन सेंटर कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत विविध नवप्रतिभावंतांच्या संकल्पनांना नवउद्योगांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.विद्यापीठाच्या या इन्क्युबेशन सेंटरला महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून ५ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या कलिना संकुलातील ग्रीन टेक्नोलॉजी इमारतीमध्ये हे इन्क्युबेशन सेंटर कार्यरत आहे.

कसे सहभागी व्हाल -

‘आयडियाथॉन १.०’ या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांना त्यांच्या नवकल्पनांच्या सादरीकरणासाठी विद्यापीठाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. 

सहभागासाठी https://tinyurl.com/MyIdeathon या लिंकवर अर्ज सादर केले जाऊ शकतात. या स्पर्धेमध्ये प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची इंडस्ट्रीमधील तज्ज्ञांच्या माध्यमातून छाननी केली जाणार असून विजेत्यांना एका वर्षाचे सहाय मिळणार आहे. स्पर्धेसाठी वयोगट आणि शैक्षणिक पार्श्वभूमीची कोणतीही अट नसून सर्वच क्षेत्रातील नवोदितांसाठी ही स्पर्धा खुली असणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे नवनियुक्त संचालक डॉ. सचिन लढ्ढा यांनी सांगितले.

Web Title: now new entrepreneurs will get financial assistance announcement of ldeathon 1.0' in university of mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.