'10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य, मी विठ्ठल पूजेसाठी पंढरपूरात जाणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 02:17 PM2018-07-22T14:17:45+5:302018-07-22T19:15:55+5:30

महाराष्ट्रातील विठ्ठलाचा सेवक म्हणून पांडुरंगाच्या महापूजेचा पहिला मान मुख्यमंत्र्यांना दिला जातो. यंदा काही संघटनांनी मी पूजेला जाऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही.

Nobody can stop me from worshiping Vitthal, but ... | '10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य, मी विठ्ठल पूजेसाठी पंढरपूरात जाणार नाही'

'10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य, मी विठ्ठल पूजेसाठी पंढरपूरात जाणार नाही'

googlenewsNext

सोलापूर - महाराष्ट्रातील विठ्ठलाचा सेवक म्हणून पांडुरंगाच्या महापूजेचा पहिला मान मुख्यमंत्र्यांना दिला जातो. यंदा काही संघटनांनी मी पूजेला जाऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. पण पंढरपुरात वारकऱ्यांच्या जीवाला धोका करण्याचा काही संघटनांचा प्रयत्न आहे. त्यामुळे 10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने मी पंढरपुरात विठ्ठलाच्या महापुजेला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत 72 हजारांची भरती रद्द करावी अशी काही संघटनांची भूमिका आहे. त्यामुळे मला विठ्ठलाची पूजा करण्यापासून रोखण्यात येत आहे. तसेच पंढरपुरात अनुचित प्रकार घडविण्याचाही या संघटनांचा डाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वारकऱ्यांमध्ये साप सोडू देऊ, चेंगराचेंगरी घडवू असे प्रकार घडविण्याचा हेतू बाळगल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच पंढरपुरातील 10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेचे हित लक्षात घेऊन मी महापूजेला जाणार नाही. विठ्ठलाचा सेवक म्हणून मी माझ्या घरी विठ्ठलाची पूजा करेल, असेही फडणवीस यांनी म्हटले. 

आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या विठ्ठल पूजेसाठी विरोध करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊच शकत नाहीत. वारकऱ्यांना भक्तीभावाने विठ्ठलाचे दर्शन घेता यावे, हीच महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा आणि विठ्ठलाचा सेवक म्हणून माझी इच्छा आहे. मराठा समाजाचा आरक्षणसंदर्भात माझी भूमिका आंदोलकांच्या हिताचीच आहे. मराठा आरक्षणाचा मुद्द्दा आता उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. सरकार त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: Nobody can stop me from worshiping Vitthal, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.