मुक्त विद्यापीठांचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द नाहीत; यूजीसीचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 09:16 PM2018-08-13T21:16:28+5:302018-08-13T21:18:23+5:30

यूजीसीच्या स्पष्टीकरणामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

no open course syllabus has been cancelled ugc clarifies | मुक्त विद्यापीठांचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द नाहीत; यूजीसीचं स्पष्टीकरण

मुक्त विद्यापीठांचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द नाहीत; यूजीसीचं स्पष्टीकरण

मुंबई: मुक्त विद्यापीठांचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द झालेले नाहीत, असं स्पष्टीकरण विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या ज्या अभ्यासक्रमांमध्ये त्रुटी आढळतील, त्या दूर करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी संबंधित विद्यापीठांना देण्यात येतीव, असं विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हणजेच यूजीसीनं म्हटलं आहे.

मुक्त विद्यापीठांचे अभ्यासक्रम रद्द झाल्याचं वृत्त प्रसारित होताच यूजीसीकडून आज मुक्त विद्यापीठांना पत्र पाठवण्यात आलं. याबद्दलची अधिक माहिती 16 ऑगस्टला यूजीसीच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी काळजी करु नये, असं आवाहनदेखील यूजीसीकडून करण्यात आलं आहे. 

यूजीसीनं 2018-19 साठी मुक्त विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. मात्र यात मुंबई दूर आणि मुक्त अध्ययन केंद्रासह (आयडॉल) 35 संस्थांची नावंच नाहीत. त्यामुळे या संस्थांची मान्यता रद्द होण्याची शक्यता असल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. या पार्श्वभूमीवर यूजीसीनं स्पष्टीकरण देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. 

Web Title: no open course syllabus has been cancelled ugc clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.