नीरव मोदीच्या मालमत्तेला मिळेना ग्राहक; लिलावाची रक्कम डीआरटीने कमी केली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 06:26 AM2023-01-10T06:26:27+5:302023-01-10T06:26:40+5:30

मरोळ येथील इमारतीचा पुन्हा लिलाव होणार

Nirav Modi's property does not get customers | नीरव मोदीच्या मालमत्तेला मिळेना ग्राहक; लिलावाची रक्कम डीआरटीने कमी केली

नीरव मोदीच्या मालमत्तेला मिळेना ग्राहक; लिलावाची रक्कम डीआरटीने कमी केली

googlenewsNext

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटींचा गंडा घातलेल्या नीरव मोदी याच्या मालमत्तांच्या विक्रीची प्रक्रिया ऋण वसुली प्राधिकरणातर्फे (डीआरटी) सुरू करण्यात आली असली तरी ग्राहकांचा योग्य प्रतिसाद न मिळाल्याने आता या मालमत्तांची किंमत कमी करून पुन्हा एकदा लिलाव करण्यात येणार आहे.

मुंबई डीआरटी-१ने या लिलावाची प्रक्रिया सुरू केली असून, या संदर्भात ५ जानेवारी रोजी आदेश जारी केले आहेत. अंधेरीतील मरोळ येथील एचसीएल हाऊस या मोदीच्या इमारतीची विक्री करण्यासाठी डीआरटीने किमान किंमत ५२ कोटी रुपये किंमत निश्चित केली होती. ही लिलाव प्रक्रिया सप्टेंबर २०२२ मध्ये सुरू केली होती. मात्र, या लिलावाला ग्राहकच न मिळाल्याने आता याची किमान किंमत ४० कोटी रुपये निश्चित करून पुन्हा एकदा लिलाव करण्यात येणार आहे. पंजाब नॅशनल बँकेसह १५ बँकांना मोदी याने गंडा घातला आहे. त्यामुळे त्याच्या मुंबईतील विविध मालमत्तांची विक्री करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मरोळ येथील या इमारतीसोबतच शहरातील आणखीही काही मालमत्तांची विक्री आता होणार आहे. 

कोणत्या मालमत्तेची किती किंमत?

उपलब्ध माहितीनुसार, लोअर परळ येथील पेनिनसुला पार्क येथे विसाव्या मजल्यावर त्याची दोन कार्यालये असून, त्याकरिता किमान किंमत ६६ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. नरिमन पॉइंट येथील मफतलाल सेंटरमध्ये देखील ६ व्या मजल्यावर त्याचे कार्यालय आहे. याकरिता किमान किंमत ६२ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. याखेरीज, पेडर रोड येथे त्याचा फोर बीएचके फ्लॅट असून, त्याकरिता किमान किंमत १५ कोटी ८७ लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. ही लिलाव प्रक्रिया १० फेब्रवारी रोजी होणार आहे.

Web Title: Nirav Modi's property does not get customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.