विस्टाडोममुळे नेरळ-माथेरान गाडीला नवा साज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 03:04 AM2019-02-17T03:04:12+5:302019-02-17T03:04:56+5:30

अत्याधुनिक सुविधा : पर्यटकांची संख्या वाढण्याचा दावा

Nerala-Matheran car gets a new look due to vestadom | विस्टाडोममुळे नेरळ-माथेरान गाडीला नवा साज

विस्टाडोममुळे नेरळ-माथेरान गाडीला नवा साज

Next

मुंबई : नेरळ-माथेरान ही मिनी ट्रेन नव्या ढंगात पर्यटकांच्या भेटीला येणार आहे. या गाडीला पारदर्शक काच (विस्टाडोम) असलेला डबा जोडण्यात येणार आहे. ‘माथेरान क्वीन’ असे नाव असलेल्या या डब्याच्या बाहेरील बाजूस नैसर्गिक चित्रे लावण्यात आली आहेत. पक्षांच्या हालचालीची छायाचित्रे त्यावर चिकटवण्यात आल्यामुळे गाडीच्या वेगाबरोबर पक्षी स्पर्धा करतोय की काय? असा आभास निर्माण होणार आहे.

२३ फेब्रुवारी पासून जोडण्यात येणाऱ्या विस्टाडोम डब्यात अनेक अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे आपसूकच पर्यटकांची संख्या वाढणार असल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. प्रवाशांना निसर्गाचा आस्वाद लुटता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष अशा विस्टाडोम बोगी तयार केली आहे. सध्या या बोगी डेक्कन क्वीन, मांडवी, कोकणकन्या, जनशताब्दी आणि पंचवटी या एक्स्प्रेस गाड्यांना जोडण्यात आली आहे. पारदर्शक काचा असलेल्या मोठ्या खिडक्या हे या कोचचे वैशिष्ट्ये आहे. या वैशिष्ट्यांमुळे प्रवाशांना आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य न्याहाळता येते. आता ही विस्टाडोमची बोगी नेरळ-माथेरान मिनी ट्रेनला जोडण्यात येणार आहे.

सेल्फीसाठी विशेष जागा
मध्य रेल्वेच्या कुर्डूवाडी येथील कारखान्यात या डब्यांची निर्मिती केली गेली आहे. या विस्टाडोम बोगीमध्ये एकूण ४० आसनाची व्यवस्था आहे. शिवाय बोगीच्या मागील बाजूस मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी विशेष जागा मिळेल. काचेच्या मोठ्या खिडक्या, पारदर्शक छत, आकर्षक रंग, नावीन्यपूर्ण अंतर्गत सजावट, आरामदायी आसनव्यवस्था, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, रंगबेरंगी एलईडी विद्युत दिवे, एलईडी टिव्ही स्क्रीन, नक्षीदार लाकडी फर्निचर अशा अनेक सुविधा या विस्टाडोममध्ये अंतर्भूत आहेत.

Web Title: Nerala-Matheran car gets a new look due to vestadom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई