खड्ड्यांना आयुक्तांचे नाव, रस्त्यांचे नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 06:20 AM2018-07-14T06:20:32+5:302018-07-14T06:20:49+5:30

मुंबईतील खड्ड्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने मुंबईतील खड्डे मोजण्याची मोहीम छेडली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क खड्ड्यांना आयुक्त व अधिकाऱ्यांचे नाव दिले आहे, तर मनसेने या वर्षी गांधीगिरी मार्गाने खड्डे बुजविले आहेत.

Name of the Commissioner for the potholes, Naming the roads | खड्ड्यांना आयुक्तांचे नाव, रस्त्यांचे नामकरण

खड्ड्यांना आयुक्तांचे नाव, रस्त्यांचे नामकरण

Next

मुंबई : मुंबईतील खड्ड्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने मुंबईतील खड्डे मोजण्याची मोहीम छेडली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क खड्ड्यांना आयुक्त व अधिकाऱ्यांचे नाव दिले आहे, तर मनसेने या वर्षी गांधीगिरी मार्गाने खड्डे बुजविले आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेलाही आता मैदानात उतरावे लागले आहे.
मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने गेल्या पाच वर्षांत सुमारे १५ हजार कोटी खर्च केले. मात्र, गेल्या महिन्याभरात मुसळधार पावसाने मुंबईच्या रस्त्यांची चाळण केली आहे. याबाबत तक्रार करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने नगरसेवकांनी खड्डे आंदोलन सुरू केले आहे. याची सुरुवात काँग्रेसने खड्डे मोजून केली. सायन येथून या आंदोलनाला सुरू झाले, तर राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी घाटकोपरमधील खड्ड्यांना आयुक्त, अतिरिक्त आयुक्त अशा सर्व अधिकाºयांची नाव देत त्या रस्त्यांचे नामकरण केले. आयुक्तांच्या नावाची पाटी चक्क पाळण्यात घालून हे आंदोलन केले. मनसेने कांदिवली, बोरीवली येथील खड्डे बुजविले. सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाल्यामुळे सेनेने आता भाजपाला लक्ष्य करीत खड्ड्यांसाठी जबाबदार धरले आहे.

जबाबदारी झटकली
खड्ड्यांची जबाबदारी शिवसेनेची नसून निवडून आलेल्या भाजपा लोकप्रतिनिधींची आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. हे दाखवून देण्यासाठी १४ जुलै दुपारी १२ वाजता सांताक्रुझ (पश्चिम) येथील दौलतनगर लिंक रोड, साने गुरुजी शाळेजवळ विद्यार्थांना घेऊन खड्ड्यांभोवती बसून ‘पारदर्शकता’, ‘पहारेकरी’ या विषयावर चित्रकला, निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.

Web Title: Name of the Commissioner for the potholes, Naming the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.