नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी 'माय फर्स्ट व्होट सेल्फी' स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 10:26 PM2019-04-28T22:26:04+5:302019-04-28T22:27:07+5:30

अभिनव उपक्रम

'My first vote selfie' competition to encourage the newcomer by DM office mumbai | नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी 'माय फर्स्ट व्होट सेल्फी' स्पर्धा

नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी 'माय फर्स्ट व्होट सेल्फी' स्पर्धा

Next

मुंबई: मुंबई शहर जिल्हयातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन कार्यरत असुन त्याचाच एक भाग म्हणुन ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ हा नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठीचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती मुंबई जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.

स्पर्धेचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवार सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही स्पर्धा असेल. युवा मतदाराने मतदान केल्यानंतर मतदान केद्रांच्या विहीत १०० मीटर मयार्देच्या बाहेर येवून आपली सेल्फी काढावी व ती जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या या firstvoteselfie@gmail.com ई-मेल अथवा (९३७२८३००७१/९३७२८३००७१) या व्हॉट्सअ‍ॅप वर पाठवावी. ही सेल्फी पाठवातांना त्यांने/तिने पुढील प्रमाणे स्पर्धेत सहभागाची नोंद करून आपले छायाचित्र व माहिती दयावी. यात नाव, आडनाव, विधानसभा मतदार संघाचे नाव/नवमतदाराचे नाव/ईपीक नंबर किंवा मतदार यादी भाग क्रमांक व मतदार यादीतील अनुक्रमांक असावा. नवमतदारांनी ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

Web Title: 'My first vote selfie' competition to encourage the newcomer by DM office mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.