महापालिका वाढविणार सीबीएसई शाळा; अखेर पालकांच्या मागणीची घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 01:38 PM2023-09-26T13:38:06+5:302023-09-26T13:38:45+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून सीबीएसई शाळांची वाढ करण्याची मागणी करणाऱ्या पालकांना दिलासा मिळणार आहे.

Municipality to increase CBSE schools Finally the demand of the parents was taken into consideration | महापालिका वाढविणार सीबीएसई शाळा; अखेर पालकांच्या मागणीची घेतली दखल

महापालिका वाढविणार सीबीएसई शाळा; अखेर पालकांच्या मागणीची घेतली दखल

googlenewsNext

मुंबई :

गेल्या अनेक दिवसांपासून सीबीएसई शाळांची वाढ करण्याची मागणी करणाऱ्या पालकांना दिलासा मिळणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागात एक सीबीएसई शाळा सुरू करण्याचा मुंबई पालिकेचा मानस आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनाही सीबीएसईचे शिक्षण घेण्याची संधी मिळेल.

सन २०२१मध्ये आणखी १० ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू करण्यात आल्या. या शाळांच्या जोडीला आयसीएसई, आयबी आणि केंब्रीज आयजीसीएसई या बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरू करण्यात आली. या शाळांनाही प्रतिसाद मिळाल्याने गेल्या वर्षी पालिकेने सीबीएसई शाळेतील छोटा शिशू व बालवाडी वर्गाची प्रत्येकी एक तुकडी वाढवली होती. अशा प्रकारे एकूण ९६० जागा वाढवण्यात आल्या. 

शिक्षण विभागाचा आढावा
  सीबीएसई शाळांची मागणी वाढत असल्यामुळे आणखी शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने पालिकेच्या शिक्षण खात्याने नियोजन सुरू केले आहे. 
  या शाळांमुळे मुलांचे व पालकांचे सीबीएसई अभ्यासक्रमाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 
  या स्वप्नपूर्तीसाठी किती शाळा सुरू करता येतील, याचा आढावा पालिकेचा शिक्षण विभाग घेत आहे.
 सध्या मुंबईत पालिकेच्या १४ सीबीएसई शाळा सुरू आहेत. २०२० साली पालिकेने जोगेश्वरीत पहिली सीबीएसई शाळा सुरू केली आहे.

Web Title: Municipality to increase CBSE schools Finally the demand of the parents was taken into consideration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.