हायटेक वाहनचोरीत वाढ झाल्याने मुंबईकर अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 02:17 AM2019-05-02T02:17:48+5:302019-05-02T06:15:38+5:30

ईसीएम यंत्रावर टोळक्यांचा हल्ला, पोलिसांच्या माहितीत उघड

Mumbai's trouble due to high-tech traffic increase | हायटेक वाहनचोरीत वाढ झाल्याने मुंबईकर अडचणीत

हायटेक वाहनचोरीत वाढ झाल्याने मुंबईकर अडचणीत

Next

मुंबई : वाहन चोरांमुळे मुंबईकरांची डोकेदुखी कायम असल्याचे चित्र मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत मुंबईतून ६३७ वाहने चोरीला गेल्याची नोंद पोलीस दफ्तरी करण्यात आली आहे. तर अन्य चोरीचे १,३६६ गुन्हे दाखल आहेत. यापैकी अवघे ३५ टक्के गुन्ह्यांची उकल केली आहे.

गेल्या तीन महिन्यांत मोटारवाहन चोरीचे ६३७ गुन्हे आहेत. घरफोड्या ४२८ तर अन्य चोऱ्यांचे तब्बल १ हजार ३६६ गुन्हे दाखल झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अन्य चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या उकलींचे प्रमाण अवघे ३५ टक्के आहे.
वाहन चोरीच्या गुन्ह्यात एकाच चावीने दार उघडता येईल आणि इंजीनही सुरू होईल अशा कार चोरांसाठी सहज लक्ष्य ठरतात. हे ओळखून वाहननिर्मिती कंपन्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. डिजिटल की, बोटाचा ठसा ओळखून प्रतिसाद देणारी यंत्रणा बसवली. मात्र, यातल्या बहुतांश उपाययोजनांचे संरक्षककडे भेदून वाहन चोऱ्या होत आहेत. फॉर्च्युनर कारला डिजिटल की आहे. चावी आणि इंजीन एका बार कोडने बांधलेले असतात. त्यामुळे बनावट चावी तयार करून कार चोरणे निव्वळ अशक्य असते. अशा परिस्थितीत बार कोड ओळखून इंजीन सुरू करणाºया ईसीएम यंत्रावरच चोरांच्या टोळ्या हल्ला करतात. हे यंत्र काढतात. स्वत:कडील ईसीएम यंत्र बसवून वाहन चोरतात. एखाद्या वाहनाचा बार कोड काय हे लांबून ओळखू शकेल, अशी उपकरणे चोरांच्या टोळीकडे आहेत. त्यामुळे ते दोन मिनिटांत अद्ययावत यंत्रणा मोडून अशा महागड्या कार चोरू शकतात.

‘धूम’ स्टाइलने सोनसाखळी चोऱ्या करण्याचे प्रमाण काही वर्षांपूर्वी मुंबईत प्रचंड वाढले होते. निव्वळ सोनसाखळी चोरीच्या दिवसाला सरासरी पाच ते सहा, तर वर्षाकाठी सुमारे दीड हजार गुन्ह्यांची नोंद होत होती. रस्त्यावरील ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष उपाययोजना आखली गेली. त्यानंतर सोनसाखळीसारखे गुन्हे करणाऱ्यांना जरब बसली. २०१५ नंतर हे गुन्हे कमी झाले. सोनसाखळी चोरांना पोलिसांनी वेसण घातली असली तरी मोटार वाहन चोरी, जबरी चोऱ्या, दिवसा-रात्रीच्या घरफोड्या अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

असा होतो व्यवहार
वापरलेल्या पण सुस्थितीतील वाहनांना मागणी आहे. अशा वाहनांची मागणी आली की ती विक्रेत्यांकडून चोरांपर्यंत येते. ठराविक रंग, साल आणि मॉडेल कुठे मिळेल याचा शोध घेणारे, तिथल्या तिथे चावी बनविणारे, त्याआधारे गाडी चोरणारे, ती सुरक्षित ठिकाणी दोन दिवस दडवून ठेवणारे आणि त्यानंतर मजल दरमजल करत विक्रेत्यापर्यंत पोहोचवणारे वेगळे अशा साखळीत वाहनचोरी होते. कार पाच लाखांची असो वा ५० लाखांची चोराला २५ ते ३० हजार रुपयांत मिळते, अशीही माहिती अधिकाऱ्याने दिली.

Web Title: Mumbai's trouble due to high-tech traffic increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.