Mumbai Train Update : ओव्हरहेड वायरवर फांदी कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 08:22 AM2019-07-06T08:22:23+5:302019-07-06T09:18:02+5:30

रोज काही ना काही बिधाडामुळे खोळंबणाऱ्या मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळीच विस्कळीत झाली आहे.

Mumbai Train Update : Central Railway traffic disrupted after the tree collapses on overhead wire | Mumbai Train Update : ओव्हरहेड वायरवर फांदी कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

Mumbai Train Update : ओव्हरहेड वायरवर फांदी कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

Next

मुंबई - रोज काही ना काही बिधाडामुळे खोळंबणाऱ्या मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळीच विस्कळीत झाली आहे. आज सकाळी मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, ही फांदी हटवल्यानंतर मरेची वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र ही वाहतूक उशिराने सुरू आहे. 
शनिवारी सकाळी मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर झाडाची फांदी तुटून ओव्हरहेट वायरवर पडली. त्यामुळे मध्य रेल्वेची सीएसएमटीवरून कल्याणला जाणारी वाहतुक खोळंबली आहे. दरम्यान, या खोळंब्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. 



 

Web Title: Mumbai Train Update : Central Railway traffic disrupted after the tree collapses on overhead wire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.