Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा विस्फोट! आज १० हजार ८६० नव्या रुग्णांची नोंद; शहरात कडक निर्बंध लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 07:28 PM2022-01-04T19:28:30+5:302022-01-04T19:30:14+5:30
Mumbai Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढत असताना मुंबई कोरोना वाढीचं केंद्रस्थान ठरत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १० हजार ८६० नवे रुग्ण आढळले आहेत.
Mumbai Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढत असताना मुंबई कोरोना वाढीचं केंद्रस्थान ठरत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १० हजार ८६० नवे रुग्ण आढळले आहेत. तर रुग्ण दुपटीचा कालावधी देखील आता ११० दिवसांवर आला आहे. रुग्णवाढीचा दर ०.६३ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. मुंबईतील रुग्णवाढ पाहता पालिका प्रशासन आणि राज्य सरकारसमोरील चिंता वाढली आहे. त्यामुळे मुंबईत आता कडक निर्बंध लादले जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मुंबईत उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आरोग्य मंत्रालय आणि अधिकारी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक असून यात निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 4, 2022
4th January, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 10860
Discharged Pts. (24 hrs) - 654
Total Recovered Pts. - 7,52,012
Overall Recovery Rate - 92%
Total Active Pts. - 47476
Doubling Rate - 110 Days
Growth Rate (28 Dec - 3Jan)- 0.63%#NaToCorona
मुंबईत सध्या ४७,४७६ जणांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९२ टक्के इतकं आहे. गेल्या २४ तासांत ६५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
Mumbai reports 10,860 fresh infections of COVID19 & 2 deaths; Active cases 47,476 pic.twitter.com/WGfQpt2KaE
— ANI (@ANI) January 4, 2022