Mumbai Rains Live : मुंबईत जोरदार पावसाची हजेरी, येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 07:36 AM2018-07-08T07:36:25+5:302018-07-08T14:06:28+5:30

दक्षिण मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरांत पहाटेपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.

Mumbai Rain live updates : Mumbai heavy rainfall in mumbai | Mumbai Rains Live : मुंबईत जोरदार पावसाची हजेरी, येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rains Live : मुंबईत जोरदार पावसाची हजेरी, येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Next

मुंबई - मुंबईसह राज्याभरात अनेक भागांत शनिवारपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आजही पहाटेपासूनच दक्षिण मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरांत जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २४ तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. शनिवारीदेखील पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. मुसळधार पावसामुळे ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली. येथील सर्व नद्या दुथडी भरून वाहत होत्या. रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना पावसाने झोडपले.  

(अवघे कोकण पाण्याखाली! ठाणे, रायगड, पालघरमध्ये पूरस्थिती)

Live Updates :








- दादर, लालबाग, परळ, वरळीमध्ये पावसाच्या जोरदार सरी

- अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, दहिसरमध्ये जोरदार पाऊस

- जोरदार पावसामुळे असल्फा परिसरात पाणी साचलं

- मेट्रोच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्टेशनखाली साचलं पाणी

- वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक मंदावली

- जोरदार पावसामुळे असल्फा परिसरात साचलं पाणी

 

Web Title: Mumbai Rain live updates : Mumbai heavy rainfall in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.