मुंबई महानगराचा विस्तार पालघर, पेणपर्यंत...; मेट्रो संचालन महामंडळाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 05:30 AM2018-11-22T05:30:58+5:302018-11-22T05:31:33+5:30

मुंबई मेट्रो संचालन महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बुधवारी झालेल्या बैठकीत एमएमआरडीएच्या भविष्यातील तीन नवीन प्रकल्पांच्या अहवालांनाही मंजुरी मिळाली आहे.

Mumbai metropolis expands to Palghar, Pen ...; Establishment of Metro Operations Corporation | मुंबई महानगराचा विस्तार पालघर, पेणपर्यंत...; मेट्रो संचालन महामंडळाची स्थापना

मुंबई महानगराचा विस्तार पालघर, पेणपर्यंत...; मेट्रो संचालन महामंडळाची स्थापना

Next

मुंबई : एमएमआरडीएनेमुंबई महानगर क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात आता वाढ केली असून, त्यात पालघर, वसई आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्यांचा उर्वरित भागही समाविष्ट करण्यात आला आहे. यासाठी मुंबई मेट्रो संचालन महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बुधवारी झालेल्या बैठकीत एमएमआरडीएच्या भविष्यातील तीन नवीन प्रकल्पांच्या अहवालांनाही मंजुरी मिळाली आहे. यामुळे वरील सर्व क्षेत्रांतील विकासाची क्षमता वाढणार असून, प्रकल्पांमुळे या भागातील गरजंूना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.
बुधवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत भविष्यातील एमएमआरडीएच्या प्रकल्पांविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुढील वर्षी अंधेरी, पूर्व ते दहिसर, पूर्व मार्गावरील मेट्रो ७ आणि दहिसर ते डी. एन. नगर मार्गावरील मेट्रो २ अ हे प्रकल्प सुरू होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो संचालन महामंडळाची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. हे महामंडळ स्वायत्त स्वरूपाचे असून, मेट्रोसोबतच मोनोरेलचेही संचालन आणि व्यवस्थापन याबाबतचे काम यापुढे पाहणार आहे. त्यासाठी सुमारे १,००० पदे
निर्माण करण्याचा निर्णयही या वेळी
घेण्यात आला.

Web Title: Mumbai metropolis expands to Palghar, Pen ...; Establishment of Metro Operations Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.