मुंबईकरांनो, प्रवासाचे नियोजन केले का? रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर असणार मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 04:11 PM2024-02-17T16:11:01+5:302024-02-17T16:13:05+5:30

रविवारी १८ फेब्रुवारी रोजी रेल्वेच्या मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

mumbai mega block 18 february 2024 on central and harbor line know all the details  | मुंबईकरांनो, प्रवासाचे नियोजन केले का? रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर असणार मेगाब्लॉक

मुंबईकरांनो, प्रवासाचे नियोजन केले का? रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर असणार मेगाब्लॉक

मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी, १८ फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

हार्बर मार्ग-

कुठे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी / वांदे अप आणि डाऊन मार्गावर, 

किती वाजता : सकाळी ११:४० ते सायंकाळी ४:४० पर्यंत, 

परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११:१६ ते सायंकाळी ४:४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी / बेलापूर / पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०:४८ ते सायंकाळी ४:४३ वाजेपर्यंत वांद्रे । गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. 

पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९:५३ ते दुपारी ३:२० पर्यंत व गोरेगाव / वांदे येथून सकाळी १०:४५ ते सायंकाळी ५:१३ पर्यंत सुटणाऱ्या सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

मध्य रेल्वे-

कुठे : ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर

किती वाजता : सकाळी १०:४० ते दुपारी ३:४० वाजेपर्यंत

परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ०९:३० ते दुपारी २:४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद / नीम-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. 

कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील व १० मिनिटे विलंबाने धावतील, कल्याण येथून सकाळी १०:२८ ते दुपारी ३:२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद / अर्धजलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे -  दिवसा कोणताही ब्लॅाक नाही.

Web Title: mumbai mega block 18 february 2024 on central and harbor line know all the details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.