Mumbai : ७०० कुटुंबीयांना मोफत टोमॅटो वाटप करून त्यांनी साजरा केला वाढदिवस!

By मनोहर कुंभेजकर | Published: August 1, 2023 06:46 PM2023-08-01T18:46:00+5:302023-08-01T18:46:21+5:30

Mumbai: सध्या टोमॅटो व अन्न धान्याचे भाव गगनाला भिडले असून दिवसेंदिवस महागाई भडकत आहे.बाजारात टोमॅटो रुपये किलो दराने मिळत असल्याने सर्वसामान्यांचे तर कंबरडे मोडले आहे.

Mumbai: He celebrated his birthday by distributing free tomatoes to 700 families! | Mumbai : ७०० कुटुंबीयांना मोफत टोमॅटो वाटप करून त्यांनी साजरा केला वाढदिवस!

Mumbai : ७०० कुटुंबीयांना मोफत टोमॅटो वाटप करून त्यांनी साजरा केला वाढदिवस!

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर
मुंबई -  सध्या टोमॅटो व अन्न धान्याचे भाव गगनाला भिडले असून दिवसेंदिवस महागाई भडकत आहे.बाजारात टोमॅटो रुपये किलो दराने मिळत असल्याने सर्वसामान्यांचे तर कंबरडे मोडले आहे. त्यामुळे  सरकारचा निषेध करण्यासाठी दहिसर पश्चिम प्रभाग क्र १ साईबाबानगर कांदरपाडा येथे ७०० गरजू कुटुंबीयांना मोफत टोमॅटो व धान्य वाटप करण्यात हा उपक्रम राबवण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना दहिसर विधानसभातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मुंबै बँक संचालक, माजी नगरसेवक, मुंबई जिल्हा उपनगर हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष अभिषेक घोसाळकर यांचा वाढदिवस सदर उपक्रम राबवून आज उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजक युवा सेनेचे विभाग अधिकारी जितेंन परमार व युवती विभाग अधिकारी महेक सुरती यांनी ही माहिती दिली. दरम्यान आपला वाढदिवस गरजूंना अधिकाधिक मदत करून साजरा करण्याचा संकल्प घोसाळकर यांनी यावेळी व्यक्त केला. 

याप्रसंगी शिवसेना उपनेते, माजी म्हाडा सभापती डॉ.विनोद घोसाळकर , आमदार विलास पोतनीस , विभागप्रमुख उदेश पाटेकर , माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद,माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, विधानसभा संघटक कर्णा अमीन, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, अक्षय राऊत, संदीप नाईक, शाखा संघटक ज्युडीथ मेंडोन्सा, दीपाली चुरी, युवासेना सहसचिव  सिद्धेश पाटेकर, ऋषिकेश ब्रीद सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Mumbai: He celebrated his birthday by distributing free tomatoes to 700 families!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.