Mumbai CST Bridge Collapse: Four people, including three women, died in a pedestrian bridge accident | Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे
Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे

मुंबई - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी साडे सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि झाहीद सिराज खान अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत, तर चौथ्या मृत व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)  रेल्वे स्थानकाबाहेरील कामा रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर 34 जण जखमी झाले आहेत. 

सीएसएमटी परिसरात बरीच कार्यालये असून चाकरमानी घरी जाण्याच्या वेळेस म्हणजेच वर्दळीच्या वेळी ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, कामा रुग्णालयातून सीएसएमटीकडे येणारा दरवाजा बंद करण्यात आला आहे. या पुलाजवळ अंजुमन इस्लाम ही शाळा असून अनेकजण कार्यालयात आणि रेल्वे स्थानकाकडे जाण्या - येण्यासाठी या पुलाचा वापर केला जातो.  

पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे 

1) अपूर्वा प्रभू (35)

2) रंजना तांबे (40)

3) भक्ती शिंदे (40)

4) झाहीद सिराज खान (32)

5) तपेंद्र सिंह (35) 


Web Title: Mumbai CST Bridge Collapse: Four people, including three women, died in a pedestrian bridge accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.