मला संमतीविना तुम्ही जन्माला का घातले?, आई-वडिलांविरोधात मुलगा जाणार कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 12:03 PM2019-02-07T12:03:37+5:302019-02-07T12:03:45+5:30

कोणाच्या पोटी जन्माला यावे, हे आपल्या हातात नसते. मात्र एका तरुणाने, संमतीविना जन्माला का घातले, असे विचारून आई-वडिलांविरोधात कोर्टात जाण्याची तयारी केली आहे.

mumbai based raphael samuel plans to sue his parents for giving birth without his consent | मला संमतीविना तुम्ही जन्माला का घातले?, आई-वडिलांविरोधात मुलगा जाणार कोर्टात

मला संमतीविना तुम्ही जन्माला का घातले?, आई-वडिलांविरोधात मुलगा जाणार कोर्टात

Next

मुंबई : कोणाच्या पोटी जन्माला यावे, हे आपल्या हातात नसते. मात्र एका तरुणाने, संमतीविना जन्माला का घातले, असे विचारून आई-वडिलांविरोधात कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. मुलांना जन्म देऊ नये, या विचाराची चळवळ राफेल सॅम्युअल उभारत आहे.
राफेल याच्याप्रमाणे समविचारी व्यक्ती आणि संस्था १० फेब्रुवारीला या विषयावर बंगळुरूमध्ये सभा घेणार आहेत. राफेलच्या भूमिकेवर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून त्याच्या अकाऊंट्सवर शिवीगाळ, ट्रोलिंग सुरू आहे.

राफेलने सांगितले की, आई- वडिलांनी जन्मासाठी आपली संमती घेणे गरजेचे होते. मला आई-वडिलांविषयी आदर आहे. आमचे नाते उत्तम आहे. मात्र सध्या जगात नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित आहे. स्पर्धेच्या युगात तरुणांना स्वत:च्या पायावर उभे राहणे अवघड आहे, संधी कमी आहेत. अपेक्षांचे ओझे वाढले आहे. त्याखाली त्यांना राहावे लागते. त्यात त्यांची दमछाक होते, त्यामुळे शारीरिक व मानसिक ताणातून त्यांना जावे लागू नये. यासाठी त्यांना जन्मालाच घालू नये. आई-वडिलांनी जन्म दिला म्हणून आयुष्यभर मुले त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली राहतात. त्याची खरे तर काहीच गरज नसल्याचे राफेलने सांगितले.

>बहुदा आम्ही दोघेही विधिज्ञ असल्यामुळे राफेलने आम्हाविरोधात कोर्टात जाण्याचा विचार केला आहे. जन्मापूर्वी मुलाची संमती कशी घ्यायची, याचे त्याने स्पष्टीकरण दिल्यास चूक स्वीकारेन. राफेलच्या स्वतंत्र. निर्भीड विचाराचा मला अभिमान आहे. त्याला त्याच्या आनंदाचा मार्ग नक्की सापडेल.
- कविता कर्नाड सॅम्युअल, राफेलची आई

Web Title: mumbai based raphael samuel plans to sue his parents for giving birth without his consent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.