साताऱ्यात रंगल्या कॉलरच्या गप्पा... मात्र उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 08:28 AM2018-05-10T08:28:30+5:302018-05-10T08:32:13+5:30

एकीकडे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत कॉलर उडवण्याच्या गप्पा सुरू असतानाच दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले मात्र मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेत रमले होते.

MP Udayan Raje meets CM Devendra Fadanvis on varsha bungalow in mumbai | साताऱ्यात रंगल्या कॉलरच्या गप्पा... मात्र उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

साताऱ्यात रंगल्या कॉलरच्या गप्पा... मात्र उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

googlenewsNext

सातारा - एकीकडे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत कॉलर उडवण्याच्या गप्पा सुरू असतानाच दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले मात्र मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेत रमले होते.  राजधानी महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शाही घरण्याकडून देण्यात येणारा शिवसन्मान पुरस्कार सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात येणार आहे. 27 मे रोजी होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. याची चर्चा बुधवारी उदयनराजेंनी मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत केली. 

कॉलर उडवणारे सरळ होतात... - शरद पवार 

खासदार उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडवण्याच्या 'स्टाइल'वर मार्मिक टिप्पणी करत शरद पवारांनी त्यांना चिमटा काढला आणि आपली 'पॉवर' दाखवून दिली. खासदार उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमधील संघर्षामुळे निर्माण झालेला पेच आपण कसे सोडवणार ? या पत्रकारांच्या प्रश्नावर पेच-बिच काही नाही, मी असलो की सर्व काही ठीकठाक होतं. उतारा वगैरे काढायची वेळच येत नाही. तुम्ही बघा त्यावेळेस सगळे सरळ असतात. उडालेली कॉलरही सरळ होते, असा टोला शरद पवार यांनी लगावला

Web Title: MP Udayan Raje meets CM Devendra Fadanvis on varsha bungalow in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.