मोटरसायकलवर 'राऊंड' नाकारला !म्हणून मित्राची नवीकोरी बाईक जाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 10:03 AM2017-12-30T10:03:43+5:302017-12-30T10:07:05+5:30

नवीन मोटरसायकलवरुन 'राऊंड' मारायला दिला नाही, म्हणून मित्राची नवी कोरी मोटरसायकल जाळण्याचा धक्कादायक प्रकार कांदिवलीत बुधवारी घडला.

Motorbike 'Route' was refused! As a friend of the new burnt car was burnt | मोटरसायकलवर 'राऊंड' नाकारला !म्हणून मित्राची नवीकोरी बाईक जाळली

मोटरसायकलवर 'राऊंड' नाकारला !म्हणून मित्राची नवीकोरी बाईक जाळली

Next
ठळक मुद्देपवन अल्पवयीन असून दारूच्या नशेत असल्याने भोर यांनी त्याला गाडीची चावी देण्यास नकार दिला. 

मुंबई - नवीन मोटरसायकलवरुन 'राऊंड' मारायला दिला नाही, म्हणून मित्राची नवी कोरी मोटरसायकल जाळण्याचा धक्कादायक प्रकार कांदिवलीत बुधवारी घडला. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी सतरा वर्षीय मुलाला अटक केली असून त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

कांदिवली पूर्वच्या हनुमाननगरमध्ये बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याठिकाणी राहणाऱ्या प्रदीप भोर यांनी नवीन सुझुकी मोटरसायकल खरेदी केली होती. त्याच रात्री त्यांचा मित्र पवन (१७) हा दारूच्या नशेत घरी परतत होता. ज्याला भोर यांनी त्यांची नवीन मोटरसायकल दाखवली. ती मोटरसायकल पाहुन पवनने भोर यांचे अभिनंदन केले. त्यानंतर 'मला एक राऊंड मारायला दे ना' , असे पवनने भोर यांना विनंती केली. मात्र पवन अल्पवयीन असून दारूच्या नशेत असल्याने भोर यांनी त्याला गाडीची चावी देण्यास नकार दिला. 

तेव्हा 'तू चावी नाही दिलीस तर तुला ठार मारेन, नाहीतर तुझी गाडी तरी पेटवेन', अशी धमकी पवनने भोर यांना दिली. मात्र पवन नशेत असल्याने असेच काहीतरी बरळत असावा असे भोर यांना वाटले. सतत पवन तेच बडबडत होता, ज्याकडे भोर यांनी दुर्लक्ष केले आणि घरी निघुन गेले. त्यानंतर पवन उशिरारात्री पर्यंत त्याच परिसरात फिरत राहिला.
 

रात्री बाराच्या सुमारास भोर यांच्या गाडीच्या शेजारी उभ्या असलेल्या मोटरसायकलमधून त्याने पेट्रोल काढले. जे भोर यांच्या मोटरसायकलवर ओतून ती पेटवून दिली. जळणाऱ्या मोटरसायकलला पाहून इमारतीचा सुरक्षारक्षक आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत ती आग विझवीली. त्यानंतर भोर देखील त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात पवनला नेले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याची रवानगी सुधारगृहात केली.

Web Title: Motorbike 'Route' was refused! As a friend of the new burnt car was burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा