पाचशेहून अधिक अधिकाऱ्यांच्या पदोन्नती अडकल्या निवडणुकीच्या कचाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 05:26 AM2019-02-01T05:26:02+5:302019-02-01T05:27:24+5:30

मे महिन्यानंतर मिळणार मुहूर्त : निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलिसांची निराशा

More than 500 officials promoted in the election campaign collapsed | पाचशेहून अधिक अधिकाऱ्यांच्या पदोन्नती अडकल्या निवडणुकीच्या कचाट्यात

पाचशेहून अधिक अधिकाऱ्यांच्या पदोन्नती अडकल्या निवडणुकीच्या कचाट्यात

Next

- जमीर काझी 

मुंबई : सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्टÑ पोलीस दलातील उपनिरीक्षकापासून ते अधीक्षक पदापर्यंतच्या ५००हून अधिक अधिकाºयांना आता आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागेल. लोकसभा निवडणुका होईपर्यंत त्यांच्या बढतीची फाईल बाजूला ठेवण्यात येणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस सर्वसाधारण बदल्यांची गडबड असणार असून त्यानंतर या पदोन्नतींबद्दलचे काम हाती घेतले जाईल. बढत्यांना किमान ६ महिने विलंब होण्याची चिन्हे असल्याने निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या वरिष्ठ निरीक्षकांना साहाय्यक आयुक्त, उपअधीक्षक पदाविनाच निवृत्त व्हावे लागेल.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व शासकीय विभागांना त्यांच्याच जिल्ह्यात किंवा तीन वर्षांहून एकाच ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचाºयांच्या २६ फेबु्रवारीपर्यंत बदल्या करण्याचे आदेश दिलेले आहेत.

देण्यात आलेल्या या आदेशांबरोबरच २०१४च्या निवडणूक काळात कार्यरत अधिकारी-कर्मचाºयांना अन्यत्र हलविण्याची सूचनाही करण्यात आली आहे. अन्य विभागाप्रमाणे पोलीस महासंचालक कार्यालयातही आयोगाच्या निर्देशाप्रमाणे बदल्यांची यादी बनविण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी सर्व आयुक्त आणि अधीक्षक कार्यालयांतून माहिती मागविण्यात येत आहेत. आयोगाच्या निकषांची १०० टक्के अंमलबजावणी करून यादी बनविण्याची सूचना पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी घटकप्रमुखांना केली आहे.
या कामास प्राधान्य दिल्यामुळे उपनिरीक्षक, साहाय्यक निरीक्षक, साहाय्यक आयुक्त आणि अप्पर अधीक्षकांच्या पदोन्नतीचे काम प्रलंबित ठेवण्यात आले आहे. या सर्व श्रेणीतील ५००च्या वर अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र असून गेल्या पाच महिन्यांपासून बढतीच्या प्रतीक्षेत आहेत.

पदोन्नती लांबणीवर पडल्याचा सर्वाधिक फटका साहाय्यक आयुक्त/ उपअधीक्षक पदासाठी पात्र असलेल्या अधिकाºयांना होणार आहे. त्यामुळे ते त्रस्त आहेत. जूनपूर्वी बढती होणे शक्य नसल्याने तोपर्यंत जवळपास ४० अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्याशिवाय अन्य विविध दर्जाचे २५ अधिकारीही निवृत्त होणार आहेत.

अशी होईल पदोन्नती
साहाय्यक निरीक्षकांची सर्वाधिक १,०६६ पदे रिक्त आहेत. तर निरीक्षकाची ६००, साहाय्यक आयुक्त/ उपअधीक्षकांची २००, अप्पर अधीक्षकांची ४५ पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. साधारणपणे रिक्त पदांच्या निम्मी पदे बढतीद्वारे भरली जातात. त्यामुळे ५००हून अधिक पदोन्नती निश्चित समजली जाते.

पीएसआयची बढती तीन वर्षांपासून रखडली
उपनिरीक्षकांची पदोन्नती तीन वर्षांपासून रखडल्याने साहाय्यक निरीक्षकाची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. यापूर्वी २०१६मध्ये बढती झाली होती. त्यानंतर त्यांच्या पदोन्नतीकडे दुर्लक्ष झाले.

Web Title: More than 500 officials promoted in the election campaign collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.