चालत्या लोकलमध्ये वृद्धेचा विनयभंग; २२ वर्षीय तरुण गजाआड
By Admin | Updated: December 14, 2015 02:19 IST2015-12-14T02:19:15+5:302015-12-14T02:19:15+5:30
नायगाव-भार्इंदरदरम्यान चालत्या लोकलमध्ये एका ७० वर्षीय वृद्धेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका २२ वर्षीय मद्यधुंद तरुणास रेल्वे पोलिसांनी अटक केली

चालत्या लोकलमध्ये वृद्धेचा विनयभंग; २२ वर्षीय तरुण गजाआड
मीरा रोड: नायगाव-भार्इंदरदरम्यान चालत्या लोकलमध्ये एका ७० वर्षीय वृद्धेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका २२ वर्षीय मद्यधुंद तरुणास रेल्वे पोलिसांनी अटक केली. वृद्धेने भार्इंदर स्थानक येताच आरडाओरडा केल्याने प्रवाशांनी तरुणास चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
जुने कपडे गोळा करून विकण्याचा व्यवसाय करणारी मूळच्या वलसाडची ७० वर्षीय वृद्ध महिला शनिवारी रात्री विरारवरून ११च्या सुमारास चर्चगेट लोकलच्या मधल्या मालडब्यात चढली. ती ग्रँट रोडला कपडे, चिंध्या विक्रीसाठी चालली होती. त्या वेळी मध्यपान केलेला अमित कुमार झा (२२) हा तरुणदेखील त्याच डब्यात होता. डब्यात एकटीच वृद्ध महिला असल्याने अमितने तिच्याशी बळजबरीने अश्लील चाळे सुरू केले.
डब्यात दुसरे कोणी नसल्याने घाबरलेल्या वृद्धेने भार्इंदर स्थानक येताच आरडाओरडा सुरू केला. लोकल फलाट क्र . ६ वर आली असता, वृद्धेचा आवाज ऐकून प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेत अमितला चोपून रेल्वे पोलिसांच्या हवाली केले.
आरोपी हा वसई पूर्वेच्या एका कंपनीत कामाला असून, त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बागवे यांनी दिली. (प्रतिनिधी)