माझे असत्याचे प्रयोग ! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं व्यंगचित्रातून पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 08:03 AM2017-10-02T08:03:04+5:302017-10-02T09:44:30+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे. महात्मा गांधी यांच्या 148व्या जयंती निमित्त राज ठाकरे यांनी शुभेच्छाचित्र काढले आहे.

MNS chief Raj Thackeray's criticism on Prime Minister Narendra Modi again | माझे असत्याचे प्रयोग ! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं व्यंगचित्रातून पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

माझे असत्याचे प्रयोग ! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं व्यंगचित्रातून पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

Next

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे. महात्मा गांधी यांच्या 148व्या जयंती निमित्त राज ठाकरे यांनी शुभेच्छाचित्र काढले आहे. मात्र या चित्राद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत. दोघंही एका मातीतील, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात 'असत्याचे प्रयोग' असे शीर्षक असलेलं पुस्तक दाखवून राज यांनी त्यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. 

यापूर्वीही  राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर व्यंगचित्राद्वारे टीका केली होती.  राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पेजवर व्यंगचित्र शेअर केलं असून यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पंतप्रधान मोदींना फरफटत आणत असल्याचं दाखवलं आहे. दाऊद फरफटत आणत असतानाही मोदी म्हणजेच केंद्र सरकार मात्र आपण फरफटत आणल्याचा दावा करत असल्याचं व्यंगचित्रातून दाखवण्यात आले. एक 'तर्क'चित्र काढत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपा सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 

फेसबुक पेज लाँचच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी स्वतः दाऊदला भारतात यायचे असून तो केंद्र सरकारशी सेटलमेंट करत आहे, असा दावा केला होता. यावरच आधारित व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटलं असून दाऊद स्वत:हून भारतात येत आहे असं दाखवण्यात आलं आहे. व्यंगचित्रात दाऊद इब्राहिम मोदींना फरफटत आणताना दाखवण्यात आलं आहे. मात्र तरीही मोदी आणलं की नाही फरफटत असं सांगत सर्व श्रेय घेत असल्याची उपहासात्मक टीका करण्यात आली आहे. 

सार्वत्रिक निवडणूक जिंकण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जात असून त्यात दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याची योजना केंद्रात सुरु आहे. स्वतः दाऊदला भारतात यायचे असून, तो विकलांग झाला आहे. त्यामुळेच सध्या तो केंद्र सरकारशी सेटलमेंट करत आहे. पण दाऊदला आणल्यानंतर कशाप्रकारे आपण त्याला आणलं याचं श्रेय भाजपा घेईल असं राज ठाकरे बोलले होते. 

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी सरकारच्या कारभारावर अत्यंत बोच-या शब्दात टीका केली होती. पण शिवसेनेवर टीका करण्याचे टाळले होते. भाजपाने केलेला सोशल मीडियाचा वापर, मुंबई मेट्रो, बुलेट ट्रेन यावर त्यांनी जोरदार टीका केली होती. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कोणासाठी करताय ? बुलेट ट्रेनने अहमदाबाद जाऊन ढोकळा खाण्यापेक्षा इथे चांगले ढोकळे मिळतात. 

गुजरात आणि मुंबईतल्या गुजराती माणसाच्या सोयीसाठी तुम्ही 1 लाख 10 हजार कोटींच कर्ज काढून बुलेट ट्रेन बनवताय, अशी टीका त्यांनी केली होती. मुंबईतून मेट्रो ट्रेन जिथून जाणारे आहे तिथले जागांचे भाव प्रचंड वाढले आहेत. या ठिकाणी घर विकत घेणे कठिण बनले आहे. मेट्रोचा आराखडाही मराठी माणसाचे महत्व कमी करण्याच्या हेतूने आखण्यात आला आहे. विकास कामांच्या नावाखाली अन्य भाषिकांचे मतदारसंघ तयार करण्याचे काम सुरू आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले होते. 

शिवाजी पार्कमध्ये मोबाईलवर पुल देशपांडे ऐकणारा मराठी मातीशी एकरुप झालेला गुजराती माझा आहे. बुलेट ट्रेन, मेट्रोच्या आडून मराठी माणसाला नख लावायचा प्रयत्न झाला तर, धिंगाणा घालू असा इशाराच राज यांनी दिला होता. नरेंद्र मोदींचे 48 टक्के तर, राहुल गांधींचे 54 टक्के फॉलोअर्स  फेक खोटे असल्याचा आरोप राज यांनी केला होता. 

Web Title: MNS chief Raj Thackeray's criticism on Prime Minister Narendra Modi again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.