शासकीय योजनाबाबत शाळा अनभिज्ञ, अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांच्या दौऱ्यातून निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 08:48 PM2019-06-30T20:48:34+5:302019-06-30T20:49:07+5:30

अल्पसंख्याक शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी योजनांच्या लाभ घ्यावा त्यासाठी आयोग पाठीशी राहण्याची ग्वाही शेख यांनी दिली.

The minority schools are unaware of the government's plans, the visits of the minority commission's President | शासकीय योजनाबाबत शाळा अनभिज्ञ, अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांच्या दौऱ्यातून निष्पन्न

शासकीय योजनाबाबत शाळा अनभिज्ञ, अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांच्या दौऱ्यातून निष्पन्न

Next

मुंबई : राज्य आणि केंद्र सरकारच्यावतीने अल्पसंख्याक समाजाच्या शाळासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्यातरी त्याबाबत संबंधित शाळाचालक अनभिज्ञ असल्याची वस्तूस्थिती आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी शिक्षण निरीक्षकांसमवेत कुर्ला, कालिना, सायन परिसरातील शाळांना भेट देवून माहिती घेतली. त्यावेळी ही बाब चव्हाट्यावर आलाी. घेण्यात आली.

अल्पसंख्याक शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी योजनांच्या लाभ घ्यावा त्यासाठी आयोग पाठीशी राहण्याची ग्वाही शेख यांनी दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देशातील सर्व धर्म,पंथ,भाषेच्या मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तसेच अल्पसंख्याक समाजाच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी ५० लाखा पर्यंत ची सोय सरकार करते अशा योजनांची किती माहिती,वार्षिक शुल्क, शाळांमध्ये मराठी भाषा फाउंडेशन कोर्स राबविला जातो का ? याबाबत आयोगाच्यावतीने प्रथमच दौरा काढून माहिती घेण्यात आली.विद्याविहार येथील फातिमा हायस्कुल, कुर्ला येथील हॉली क्रॉस हायस्कूल, कालिना येथील मेरी इमेक्युलेट गर्ल्स हायस्कूल तसेच सायन येथील अवर लेडी हायस्कूल ला भेट देऊन सर्व शासकीय शिक्षण अधिकार्यांना शक्य तितक्या लवकर सर्व संस्थाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्व अल्पसंख्याक संस्थांमध्ये सरकारी योजना राबविण्यासाठी अध्यक्षांनी निर्देश दिले. येत्या काही दिवसामध्ये शिक्षणमंत्री व मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The minority schools are unaware of the government's plans, the visits of the minority commission's President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.