म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीत एक तासात तीन हजार अर्जांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 07:57 AM2021-08-26T07:57:51+5:302021-08-26T07:58:10+5:30

MHADA : मंगळवारी ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. २४ ऑगस्टपासून अर्ज नोंदणीची सुरुवात झाली.

MHADA Konkan Mandal draws 3,000 applications in one hour pdc | म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीत एक तासात तीन हजार अर्जांची विक्री

म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीत एक तासात तीन हजार अर्जांची विक्री

Next

मुंबई : म्हाडा कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीच्या अर्जांची नोंदणी सुरू झाल्यानंतर पहिल्या एक तासातच तीन हजार अर्जांची विक्री झाली. एका घरासाठी अडीचशे लोकांची मागणी असल्याचे चित्र आहे. 
कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ मंगळवारी ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. २४ ऑगस्टपासून अर्ज नोंदणीची सुरुवात झाली. अर्ज नोंदणीची प्रक्रिया २२ सप्टेंबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहील. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख व वेळ २३ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. अनामत रकमेच्या 
ऑनलाइन स्वीकृतीकरिता अंतिम दिनांक व वेळ २४ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. 

Web Title: MHADA Konkan Mandal draws 3,000 applications in one hour pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा