पावसाळ्यातही मेट्रोची कामे ‘सुसाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 02:44 IST2018-05-19T02:44:14+5:302018-05-19T02:44:14+5:30
या वर्षी भर पावसाळ्यातही विनाअडथळा मेट्रोची कामे सुरू राहणार आहेत. त्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कामाचे सुटसुटीत व्यवस्थापन केले आहे.

पावसाळ्यातही मेट्रोची कामे ‘सुसाट’
मुंबई : या वर्षी भर पावसाळ्यातही विनाअडथळा मेट्रोची कामे सुरू राहणार आहेत. त्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कामाचे सुटसुटीत व्यवस्थापन केले आहे. तसेच पावसाळ्यात मेट्रोच्या कामांमुळे विस्कळीत होणाऱ्या वाहतूक व्यवस्थेवरही यंदा परिणाम होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मेट्रो-३ प्रकल्पाचे काम करणाºया कंत्राटदारांना एप्रिल महिन्यापासूनच सूचना देण्यात आल्या असून, त्याप्रमाणे योग्य त्या पद्धतीने तत्काळ कामाला सुरुवात झाल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली आहे.
पालिकेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पावसाळ्यातील कामे करण्यास कंत्राटदारांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सूचना दिल्या आहेत. पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई कामे, जलवाहिन्या वळविण्याची कामे, पाण्याचा निचरा करणाºया पंपाची व्यवस्था करणे आदी कामे पूर्ण झाली असून, काही ठिकाणी प्रगतिपथावर आहेत. तसेच काही कामे १ जूनपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. याशिवाय अतिवृष्टीदरम्यान मेट्रोच्या कामामुळे होणाºया समस्यांच्या निवारणासाठी कॉर्पोरेशनद्वारे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.
प्रकल्पाचे काम विनाअडथळा व्हावे व नागरिकांना असुविधा होऊ नये, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे प्रकल्प परिसरात अतिरिक्त उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यामध्ये जेव्हीएलआर येथील पर्जन्य जलवाहिनीच्या कामाचा समावेश आहे. याशिवाय पूरप्रवण परिस्थिती असलेल्या सांताक्रूझ परिसरात पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई करून त्यांना योग्य ठिकाणी वळविण्यात आलेले आहे. वांद्रे-कुर्ला संकुल परिसरानजीक जगत विद्या मार्ग येथे पालिकेच्या परवानगीने ३ मीटर बाय २ मीटरची पर्जन्य जलवाहिनी प्रस्तावित मेट्रो-३ च्या स्थानकापर्यंत वाढविण्याचे काम सध्या सुरू असून, ते १ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. जगत विद्या मार्ग मेट्रो-३च्या बांधकाम स्थळापासून लांब असले, तरीही नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप लावण्यात येणार आहेत. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत बैठकीदरम्यान दिल्या गेलेल्या सूचनांचे पालन केले जात असून, अतिवृष्टीच्या परिस्थितीत पालिकेच्या मार्गदर्शनाअंतर्गत अतिरिक्त उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
>मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मुंबईकरांसाठी उपयुक्त सार्वजनिक वाहतूक प्रकल्प राबवत आहे. आम्ही मुंबई महानगरपालिकेसोबत समन्वय ठेवत मान्सूनपूर्व कामे करीत आहोत. मेट्रो-३ च्या बांधकाम स्थळांचे व्यावसायिकरीत्या नियोजन केले जात असून. पावसाळ्यादरम्यान मेट्रो-३च्या कामांमुळे नागरिकांना कुठलीही असुविधा होणार नाही.
- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन