#MeToo: Sajid Khan debunked guy- Azhana Kumra | #MeToo: साजिद खान विकृत माणूस- आहाना कुम्रा
#MeToo: साजिद खान विकृत माणूस- आहाना कुम्रा

मुंबई : ‘मी टू’ प्रकरणात अडकलेल्या दिग्दर्शक साजिद खानवर आता अभिनेत्री आहाना कुम्रा हिनेदेखील आरोपाची तोफ डागली आहे. साजिद खान हा विकृत माणूस आहे. मी तुला १०० कोटी रुपये दिले तर तू श्वानासोबत सेक्स करशील का, असे अनेक विकृत प्रश्न त्याने मला विचारल्याचा गौप्यस्फोट तिने माध्यमांशी बोलताना केला आहे.

आहानाने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सलोनी चोप्रा हिने साजिदबद्दल जे सांगितले तोच अनुभव मलादेखील आला. एका मिटिंगसाठी मी वर्षभरापूर्वी त्याला भेटले. त्याने मला घरी बोलावले होते. कामाच्या चर्चेसाठी त्याने मला बेडरूममध्ये बोलावले. त्याची आईदेखील घरी होती. बेडरूममध्ये जाण्यापेक्षा आपण बाहेरच बसून बोलू या, असे मी त्याला सुचविले. पण, आपल्या कामामुळे आईला त्रास नको, असे म्हणत तो बेडरूममध्ये घेऊन गेला. रूममध्ये अंधार होता. मी सांगितल्याने त्याने लाईट लावली. माझी आई पोलीस अधिकारी आहे हे मी त्याला सांगितले. त्याने मला स्पर्श केला नाही; मात्र विचित्र प्रश्न विचारत राहिला. मी तुला १०० कोटी रुपये दिले तर तू श्वानासोबत सेक्स करशील का, असे अनेक विकृत प्रश्न तो विचारत होता.

आहानाने साजिदबरोबरच सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनी ‘क्वॉन’चे सहसंस्थापक अनिर्बन दास ब्लावरही आरोप केले. अनिर्बनचे महिलांप्रति वर्तन चुकीचे असते. अनिर्बनचा माझ्याबाबतचा उद्देश खूप चुकीचा होता. सुदैवाने त्याचा हेतू साध्य झाला नाही, असे ती म्हणाली. काही दिवसांपूर्वी लैंगिक गैरवर्तणुकीच्या गंभीर आरोपांमुळे ब्ला याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.


Web Title: #MeToo: Sajid Khan debunked guy- Azhana Kumra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.