#MeToo : अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 09:39 AM2018-11-21T09:39:14+5:302018-11-21T11:17:38+5:30

#MeToo : संस्कारी बाबू म्हणून ओळख असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#MeToo : rape case filed against bollywood Actor Alok Nath | #MeToo : अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल 

#MeToo : अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्देआलोकनाथांविरोधात ओशिवरा पोलिसात गुन्हा दाखल 19 वर्षांपूर्वी केला बलात्कार - विनता नंदाआलोकनाथ यांनी फेटाळला बलात्काराचा आरोप

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई - संस्कारी बाबू म्हणून ओळख असलेले अभिनेते आलोकनाथ यांच्यावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 वर्षांपूर्वी आलोकनाथ यांनी बलात्कार केल्याचा आरोप फिल्ममेकर विनता नंदा यांनी केला होता. याप्रकरणी मंगळवारी (20 नोव्हेंबर) ओशिवरा पोलिसांनी त्यांच्याविरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. मात्र अद्यापपर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही. 

आलोकनाथ यांच्याविरोधात नंदा यांनी 8 ऑक्टोबरला एक लेखी तक्रारपत्र ओशिवरा पोलिसांना दिले होते. त्या तक्रारीची शाहनिशा केल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल,असे ओशिवरा पोलिसांकडून सांगण्यात आले होते. अखेर मंगळवारी दुपारी 2.35 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जबरी आणि अनैसर्गिक संभोग केल्याप्रकरणी भादवी ३७६(१) आणि ३७७ ही कलमे त्यांच्यावर लावण्यात आली आहेत.

(#MeToo : आलोकनाथ यांच्या पत्नीची मानहानीचा दावा करणारी मागणी कोर्टाने फेटाळली)


फिल्ममेकर नंदा यांच्या राहत्या घरी आलोक यांनी त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. #MeToo या मोहिमेअंतर्गत हे प्रकरण पुढे आले होते. याप्रकरणी अद्याप आलोक यांना अटक करण्यात आली नसून नंदा यांचे आरोप खोटे असल्याचा दावा आलोक यांनी केला होता. २५ ऑक्टोबरला त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यांना दिलासा मिळाला नव्हता. अभिनेत्री संध्या मृदुल आणि दीपिका आमीन यांनीही आलोक नाथसोबतचा त्याचा भयाण अनुभव माध्यमांसमोर आणला होता.

Web Title: #MeToo : rape case filed against bollywood Actor Alok Nath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.