मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 06:34 AM2019-05-11T06:34:49+5:302019-05-11T06:35:07+5:30

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते माहिम दरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि इतर पायाभूत कामे केली जातील.

Mega Blocks on the Central, Western Railway Road tomorrow | मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

Next

मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते माहिम दरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि इतर पायाभूत कामे केली जातील.

मध्य रेल्वे मार्गावर कळवा स्थानकात तांत्रिक काम करण्यात येणार आहे. याकरिता ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान रविवारी, १२ मे रोजी ब्लॉक घेण्यात येईल. त्यानुसार, ठाणे ते कल्याण डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आणि दिवा ते ठाणे सीएसएमटी दिशेकडील मार्गावर सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. सकाळी १०.५२ ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत कल्याण दिशेकडील लोकल जलद मार्गावरून धावतील. त्यामुळे या लोकल कळवा, मुंब्रा आणि ठाकुर्ली या स्थानकांवर थांबणार नाहीत. सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावरील लोकल सकाळी १०.५३ ते दुपारी २.३ वाजेपर्यंत जलद मार्गावर धावतील. त्यामुळे मुंब्रा, कळवा या स्थानकांवर थांबणार नाहीत.

सांताक्रुझ ते माहिम जम्बोब्लॉक

रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते माहिम स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सांताक्रुझ ते माहिम स्थानकादरम्यान विरार दिशेकडील धिम्या मार्गावर जाणाऱ्या लोकल जलद मार्गावरून धावतील. महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड या स्थानकांवर त्या थांबणार नाहीत. यासह लोअर परळ, माहिम आणि खार स्थानकावर फलाटाची लांबी कमी असल्याने येथे लोकलला दोनदा थांबा दिला जाईल.


कुर्ला ते सायनदरम्यान आज रात्रकालीन विशेष ब्लॉक


मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सायन या स्थानकांदरम्यान रविवारी रात्री ब्लॉक घेऊन तांत्रिक कामे केली जातील. दोन्ही दिशेकडील धिम्या आणि जलद मार्गावरील आणि हार्बर मार्गावरील दोन्ही मार्गांवर शनिवारी रात्री म्हणजेच रविवार सुरू होताना पावणेएक ते सकाळी सव्वासहा वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉक काळात मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते कुर्लादरम्यान लोकल बंद राहील. शेवटची लोकल मध्यरात्री १२.०५ला असेल. रात्री सव्वाबारा वाजता सीएसएमटी ते कसारा आणि रात्री १२.२५ ची सीएसएमटी ते कर्जत लोकल कुर्ला स्थानकातून धावेल. पहाटे सव्वाचार, ५ वाजताची सीएसएमटी ते कसारा, पहाटे ४.२४ची सीएसएमटी ते खोपोली, पहाटे ४.४८ वाजताची, पहाटे ५.१० मिनिटांची सीएसएमटी ते कर्जत लोकल आणि पहाटे ५.१२ची सीएसएमटी ते आसनगाव लोकल कुर्ला स्थानकातून धावेल.
रविवारी सकाळी ६ वाजून २ मिनिटांची कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल सीएसएमटी ते आसनगाव चालविण्यात येईल. सीएसएमटी दिशेकडे जाणारी मध्यरात्री २ वाजून ३५ मिनिटांची तसेच त्यापुढील ब्लॉक काळात लोक कुर्लापर्यंत चालविण्यात येणार आहे.

मानखुर्द ते वडाळादरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक, लोकलसेवा रद्द


मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल सेवा मानखुर्द ते वडाळादरम्यान रात्री साडेपाच तासांचा ब्लॉक असेल. ब्लॉक काळात या मार्गावरून बेलापूर दिशेकडे जाणारी शेवटची लोकल शनिवारी रात्री म्हणजेच रविवार सुरू होताना रात्री १२ वाजून ०५ मिनिटांची सीएसएमटी ते बेलापूर असणार आहे. रात्री ११ वाजून १३ मिनिटांची पनवेल ते सीएसएमटी लोकल शेवटची लोकल चालविण्यात येईल. त्यानंतर रात्री लोकलसेवा बंद करण्यात आली आहे.
रविवारी सीएसएमटी दिशेकडे जाणारी पनवेल ते सीएसएमटी लोकल पहाटे ५ वाजून ५० मिनिटांची चालविण्यात येईल. सकाळी ६ वाजून ८ मिनिटांची पनवेल दिशेकडे जाणारी सीएसएमटी ते पनवेल लोकल पहिली लोकल चालविण्यात येईल.
देखभाल तसेच दुरुस्तीच्या विविध कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकचा परिणाम अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर होईल. शनिवारी आणि रविवारी गाडी क्रमांक ५११५३-५४ सीएसएमटी ते भुसावळ मुंबई पॅसेंजर, गाडी क्रमांक २२१०५-०६ सीएसएमटी ते पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०१०-०९ पुणे ते सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२१०१-०२ मनमाड-सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस गाडी क्रमांक १२११०-०९ मनमाड-सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

Web Title: Mega Blocks on the Central, Western Railway Road tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.