ऐन थर्टीफर्स्टलाच माथेरानची मिनीट्रेन रुळांवरून घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 05:19 PM2018-12-31T17:19:27+5:302018-12-31T17:40:07+5:30

दोन वर्षांपूर्वी मे 2016 मध्ये माथेरानची मिनीट्रेन आठवड्याभरातच दोन वेळा घसरली होती.

Matheran's mini train derailed on track | ऐन थर्टीफर्स्टलाच माथेरानची मिनीट्रेन रुळांवरून घसरली

ऐन थर्टीफर्स्टलाच माथेरानची मिनीट्रेन रुळांवरून घसरली

Next

माथेरान : दोन वर्षांपूर्वी बंद असलेली माथेरानचीमिनी ट्रेन पुन्हा सुरु करण्यात आली खरी, मात्र आज पुन्हा ही ट्रेन घसरली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि गुलाबी थंडीचा आनंद लुटण्य़ासाठीच्या ऐन हंगामातच ही घटना घडली आहे. 


दोन वर्षांपूर्वी मे 2016 मध्ये माथेरानची मिनीट्रेन आठवड्याभरातच दोन वेळा घसरली होती. यामुळे जवळपास वर्षभर दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या नावाखाली बंद असलेली ट्रेन 2017 मध्ये सुरु करण्यात आली होती. मात्र, ही ट्रेन आता पर्यंत दोनवेळा घसरली होती. आज पुन्हा ही ट्रेन घसरली आहे. 


मिनी ट्रेनचे दोन डबे स्थानकावरच घसरले आहेत. 

Web Title: Matheran's mini train derailed on track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.