मराठी माणसा जागा हो, कोकण रेल्वेचा धागा हो!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 04:52 AM2019-01-25T04:52:11+5:302019-01-25T04:52:17+5:30

कोकण रेल्वे मार्गावर २४ स्थानकांवर असलेले स्टॉल चालविण्यासाठी नुकत्याच काढण्यात आलेल्या निविदांची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Marathi people should be awake, Konkan Railway thread! | मराठी माणसा जागा हो, कोकण रेल्वेचा धागा हो!

मराठी माणसा जागा हो, कोकण रेल्वेचा धागा हो!

Next

- कुलदीप घायवट 
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर २४ स्थानकांवर असलेले स्टॉल चालविण्यासाठी नुकत्याच काढण्यात आलेल्या निविदांची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. एरव्ही मोजक्याच इच्छुकांच्या नजरेस पडेल अशी ही जाहिरात कोकणातून आलेल्या कलाकारांच्या ध्यानात आली आणि एकदम हे स्टॉल चालविण्यास घेण्याचा प्रयत्न करा अशी मोहीमच सुरू झाली.
‘कोकण रेल्वे स्थानकावर स्टॉलसाठी निविदा निघाल्यात, प्रयत्न करा नंतर स्टॉल हातचे गेल्याचे बोलू नका...’ अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागल्या आहेत. याआधी कोकण रेल्वेवर असलेल्या स्टॉलसाठी निविदा निघाल्या असताना ते स्टॉल कोकणाबाहेरच्यांना मिळाले. त्याची मग जोरात चर्चा झाली.
अभिनेता दिगंबर नाईक यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडिया अकाउंटवरून स्टॉल्ससंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. बेरोजगार मराठी तरुणांनी रोजगारासाठी या संधीचा फायदा घ्यावा, अशी भावना मनाशी बाळगून ही मोहीम त्यांनी सुरू केली आहे. रेल्वेत काम करणाऱ्या मराठी माणसांचा टक्का कमी आहे. रेल्वेतल्या नोकºयांकडे लक्ष ठेवून, भरतीत सहभागी होण्याचा इतरांसारखा दृष्टिकोन मराठी माणसांनी दाखवायला हवा, असे आवाहन या कलाकारांनी केल्याने या जाहिरातीची चर्चा कोकणातून आलेल्या लोकांच्या ग्रुपवर रंगू लागली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या २४ स्थानकांवरील बहुउद्देशीय स्टॉलसाठी या निविदा कोकण रेल्वे महामंडळाने काढल्या आहेत. त्यासाठी २२ फेब्रुवारी ही अंतिम तारीख आहे.
>रोजगार मिळावा, हीच इच्छा
कोकणातील रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर मराठी विशेषत: कोकणातील माणूस असायला हवा. त्यामुळेच आपल्या माणसाला स्टॉलबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. मालवणी, कोकणी, भाषिक माणसाला रोजगार मिळावा, हीच इच्छा या पोस्टमधून करण्यात येत आहे. मराठी माणसाने यासाठी मेहनत घ्यावी, अशी कळकळीची विनंती आहे. - दिगंबर नाईक, अभिनेता
>मराठी माणसाने फायदा घ्यावा
कोकण रेल्वे स्थानकातील स्टॉल्सवर मराठी माणूस हवा. यामुळे स्टॉलवर महाराष्ट्रीय चवीचे पदार्थ खाता येतील. मराठी माणसाला रोजगाराची संधी चालून आली आहे. याचा फायदा प्रत्येक मराठी माणसाने घ्यावा. - भालचंद्र (भाऊ) कदम, अभिनेता

Web Title: Marathi people should be awake, Konkan Railway thread!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.