मराठा आरक्षण : मुकुल रोहतगी मांडणार शासनाची बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 07:26 AM2019-02-04T07:26:53+5:302019-02-04T07:27:04+5:30

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उच्च न्यायालयात ६ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी सुरू होत आहे.

Maratha Reservation: The government's side will present Mukul Rohatgi | मराठा आरक्षण : मुकुल रोहतगी मांडणार शासनाची बाजू

मराठा आरक्षण : मुकुल रोहतगी मांडणार शासनाची बाजू

Next

मुंबई  - मराठाआरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उच्च न्यायालयात ६ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी सुरू होत आहे. देशाचे माजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी मराठाआरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका मांडणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगितले.
आरक्षण न्यायालयात टिकावे, यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे सरकारची बाजू मांडतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र, साळवे यांना महत्त्वाच्या सुनावण्यांसाठी परदेशात जावे लागणार असून, ते एप्रिल महिन्यातच उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे शासनाची भूमिका मांडण्यासाठी रोहतगी यांना फडणवीस यांनी विनंती केली, त्यांनी ती मान्य केली आहे. त्यानुसार, त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. त्यांच्यासोबतच ज्येष्ठ विधिज्ञ परमजीत सिंह पटवालिया व सर्वोच्च न्यायालयातील सरकारी वकील कटणेश्वरकर यांचीही नियुक्ती केली.

Web Title: Maratha Reservation: The government's side will present Mukul Rohatgi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.