‘दिव्यांश’प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 05:23 AM2019-07-16T05:23:45+5:302019-07-16T05:23:50+5:30

गोरेगाव येथे घरासमोरील उघड्या गटारात पडून बेपत्ता झालेल्या दिव्यांश सिंह याच्या वडिलांनी सोमवारी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Manusadha's offense in 'Divashesh' case | ‘दिव्यांश’प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा

‘दिव्यांश’प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा

Next

मुंबई : गोरेगाव येथे घरासमोरील उघड्या गटारात पडून बेपत्ता झालेल्या दिव्यांश सिंह याच्या वडिलांनी सोमवारी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ‘दिव्यांश बेपत्ता होऊन पाच दिवस उलटले, तरी त्याचा शोध न लागल्याने तो आता जिवंत नसेल,’ असा हंबरडा त्यांनी पोलीस स्थानकात फोडला. त्यांच्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
दिव्यांशचे वडील सूरजभान सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, माझा मुलगा १० जुलै रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास उघड्या गटारात पडून बेपत्ता झाला. त्यानंतर, सतत पाच दिवस पोलीस, अग्निशमन दल, तसेच महानगरपालिकेच्या पथकाने विशेष मोहीम राबवत त्याचा शोध घेतला. तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे तो आता जिवंत असणे शक्य नाही. मात्र, या सगळ्याला कारणीभूत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित गटाराबाबत वेळोवेळी तक्रार देण्यात आली होती. यंदाच्या पावसाळ्यात नालेसफाई कर्मचारी व त्यांचे पर्यवेक्षण करणाºया अधिकाºयांनी योग्य खबरदारी घेतली नाही. उघड्या गटारवजा नाल्यावर सिमेंटशिट्स किंवा काँक्रिटीकरण करून ते बंद करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे त्या उघड्या गटारात पडून दिव्यांशचा मृत्यू झाल्याचा आरोप सूरजभान यांनी केला.
दरम्यान, २९ जूनलाच गटारावर झाकणे लावली असल्याचे पालिकेने यापूर्वीच सांगितले आहे. मात्र दिव्यांशचा शोध घेण्याच्या
कामाला प्राधान्य देऊन पालिकेने याबाबत कोणतीही भूमिका घेतली नव्हती. पालिकेने आता दिंडोशी पोलिसांकडे एक पत्र पाठवूव याबाबतचे सीएसटीव्ही फुटेजही
सादर केले आहे. पाण्याचा
झटपट निचरा व्हावा, या उद्देशाने गटारावरून काढलेले झाकणे पुन्हा लावण्यात आले नव्हते. काही दिवसांनी या गटारावर प्लायवूड
टाकून ठेवण्यात आले, असे तेथील सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रीकरणावरून उघड झाले आहे. मात्र, प्लायवूड हटविल्यामुळे ७ ते १० जुलै या कालावधीत गटार उघडेच होते. झाकण कुणी काढले, प्लायवूड कोणी ठेवले, त्यानंतर प्लायवूड
कोणी काढले याची चौकशी पालिकेमार्फत सुरू असल्याची
माहिती पालिका अधिकाºयांनी
दिली.
>पालिकेने फोडले दुसºयावर खापर
१ जुलै रोजी गोरेगावात मुसळधार पाऊस पडत असल्याने, अज्ञात व्यक्तीने पाण्याचा निचरा होण्यासाठी तेथील गटारावर असलेले झाकण काढल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तो व्यक्तीच या घटनेला जबाबदार असल्याचा दावा पालिका करीत आहे. या गटारावरील झाकण अज्ञात व्यक्ती काढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचा दाखला देत, महापालिकेने आपले हात वर केले आहेत. झाकण काढणाºया व्यक्तीला शोधून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘पी’ दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिंडोशी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.

Web Title: Manusadha's offense in 'Divashesh' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.