Kerala Floods; महाराष्ट्राचाही खारीचा वाटा, केरळला २० कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 04:56 PM2018-08-18T16:56:22+5:302018-08-18T18:49:02+5:30

Kerala Floods; केरळमध्ये ओढवलेल्या अतिवृष्टीच्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे 20 कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांशी कालपासूनच

Maharashtra runs to help Kerala, Chief Minister appealed to the people | Kerala Floods; महाराष्ट्राचाही खारीचा वाटा, केरळला २० कोटींची मदत

Kerala Floods; महाराष्ट्राचाही खारीचा वाटा, केरळला २० कोटींची मदत

Next

मुंबई - केरळमध्ये ओढवलेल्या अतिवृष्टीच्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे 20 कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांशी कालपासूनच राज्य सरकार संपर्कात असून त्यांच्याशी समन्वय साधून अन्नपुरवठा व इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे. समाजाच्या सर्व स्तरातील घटकांनी शक्य ती मदत करावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली असून पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. महाराष्ट्राकडूनही तातडीची मदत म्हणून 20 कोटींचे अर्थसहाय्य मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. राज्य शासन केरळ सरकारशी शुक्रवारपासून सातत्याने संपर्कात असून त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य पुरविण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री सचिवालयाच्या पुढाकाराने राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची विशेष बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली. त्यात एका पथकाची नियुक्ती करुन त्यावर याबाबतच्या समन्वय आणि कार्यवाहीची जबाबदारी सोपव‍ण्यात आली आहे. केरळ पूरग्रस्तांसाठी अन्नाचा पुरवठा ही प्राधान्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध सामाजिक, स्वयंसेवी तसेच व्यावसायिक संस्थांशी राज्य शासनाने समन्वय साधत अन्न पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. एमसीएचआय–क्रेडाई या संघटनेतर्फे दीड कोटी रुपये किंमतीचे अन्न उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राजस्थानी वेल्फेअर असोसिएशनकडून 51 लाख आणि जितो इंटरनॅशनलकडूनही 51 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. एकूण 11 टन अन्न आतापर्यंत उपलब्ध करुन देण्यात आले असून पैकी 6 टन अन्नपुरवठा आज रवाना झाले आहे.

Web Title: Maharashtra runs to help Kerala, Chief Minister appealed to the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.