मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर, जखमींच्या उपचाराचा खर्च उचलणार महाराष्ट्र सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 02:20 PM2017-09-29T14:20:37+5:302017-09-29T15:01:51+5:30

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर घडलेल्या चेंगरा चेंगरी घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

Maharashtra government will release five lakh relief aid to the relatives of the deceased and the cost of the treatment of the injured | मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर, जखमींच्या उपचाराचा खर्च उचलणार महाराष्ट्र सरकार

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर, जखमींच्या उपचाराचा खर्च उचलणार महाराष्ट्र सरकार

Next
ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार आहे. 

मुंबई -  एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर घडलेल्या चेंगरा चेंगरीच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आपल्याला या घटनेने धक्का बसला असून, या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्याचे मुख्यसचिव आणि पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा केली असून, त्यांना रुग्णालयात पोहोचण्याचे निर्देश आहेत. 

या दुर्घटनेची महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून चौकशी केली जाईल तसेच जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करु असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार आहे.





Web Title: Maharashtra government will release five lakh relief aid to the relatives of the deceased and the cost of the treatment of the injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.