प्रियकराने लग्न केले म्हणून फेसबूकवर टाकले अश्लील व्हीडीओ, प्रेयसीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 10:28 PM2018-07-08T22:28:02+5:302018-07-08T22:28:10+5:30

मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने तरूणीला अटक केली.

As a lover married, porn video on Facebook, girlfriend arrested | प्रियकराने लग्न केले म्हणून फेसबूकवर टाकले अश्लील व्हीडीओ, प्रेयसीला अटक

प्रियकराने लग्न केले म्हणून फेसबूकवर टाकले अश्लील व्हीडीओ, प्रेयसीला अटक

मुंबई - प्रियकराने दुसऱ्या तरूणीशी लग्न केल्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी प्रेयसीने फेसबुकवर चार बोगस अकाऊंट बनवली. यावर प्रियकर आणि तिच्या बहिण्याचे फोटो, अश्लील व्हीडीओ टाकून बदनामी करणाऱ्या आरती जाधव (२३) या तरूणीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली.

विलेपार्ले येथे राहणाऱ्या महेश आणि त्याच्या बहिणीला मे महिन्यापासून मोबाईलवर काॅल येऊ लागले. काॅल करणारे सर्वजण अश्लील भाषेत बोलत. महिनाभर हा प्रकार सुरू होता. काही सुरू आहे दोघांनाही काहीच कळत नव्हते. याचवेळी त्यांच्या काही नातेवाईकांनी फेसबुक अकाऊंटवरील अश्लील फोटो आणि व्हीडीओबाबत सांगितले. महेश याने फेसबुकवर पाहिले त्यावेळी त्याला धक्काच बसला. महेशच्या बहिणीने तर मोबाईल नंबरच बंद केला. बदनामी होत असल्याने दोघांनीही यासंदर्भात विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार केली. चारही बोगस अकाऊंटच्या प्रोफाईलमध्ये महेशच्या बहिणाचा मोबाईल नंबर असल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. 

महेश आणि त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबाबत मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ८ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय साळुंखे, सहायक निरिक्षक विठ्ठल चौगुले, उपनिरिक्षक विचारे, चिंचोलकर, पार्से यांच्या पथकाने चौकशी सुरू केली. चौकशीमध्ये महेश याचे आरती जाधव या तरूणीला ताब्यात घेतले. आपणच महेश आणि तिच्या बहिणीचे बोगस फेसबुक अकाऊंट बनविल्याची कबुली आरतीने दिली. आरतीचे महेश सोबत आठ वर्षे प्रेमप्रकरण सुरू होते. दोन वेळा त्यांचे ब्रेकअपही झाले. मे २०१८ मध्ये महेशने दुसऱ्या तरूणीशी लग्न केले. त्यामुळे महेशला धडा शिकविण्यासाठी आरतीने बोगस फेसबुक अकाऊंटची शक्कल लढवली.

Web Title: As a lover married, porn video on Facebook, girlfriend arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.